• Download App
    Nawab Malik : "बिनखात्याचे मंत्री" जेलमध्ये, शासन निर्णय मात्र "अल्पसंख्यांक मंत्री" म्हणून जाहीर!! । Nawab Malik: "Minister without Account" in jail, but the ruling was announced as "Minority Minister" !!

    Nawab Malik : “बिनखात्याचे मंत्री” जेलमध्ये, शासन निर्णय मात्र “अल्पसंख्यांक मंत्री” म्हणून जाहीर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्याकडचे अल्पसंख्यांक मंत्रालय काढून घेऊन ते जितेंद्र आव्हाड यांना सोपवले आहे. पण याची भनक महाराष्ट्र शासनाला नाही. महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या निर्णयांची जी यादी ट्विट केली आहे, त्यामध्ये नवाब मलिक हे अजूनही “अल्पसंख्यांक मंत्री” आहेत आणि त्यांच्याच नावाने एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. Nawab Malik: “Minister without Account” in jail, but the ruling was announced as “Minority Minister” !!

    येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता, असा शासन निर्णय नवाब मलिक यांच्या नावाने जाहीर करून ते “अल्पसंख्यांक मंत्री” असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सीएमओ ट्विटर हँडल वरून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप होऊनही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. ते सध्या तुरुंगात आहेत. याचा सीएमओ ट्विटर हँडल चालवणार्‍याला पत्ताच नाही. बाकीच्या मंत्रालयाशी संबंधित निर्णय विविध मंत्र्यांच्या नावानिशी आणि पदानिशी जाहीर करण्यात आले आहेत. तसेच नवाब मलिक हे अजूनही अल्पसंख्यांक मंत्री आहेत असेच गृहीत धरून सीएमो ट्विटर हँडलवरून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तुरुंगात असलेल्या बिन खात्याच्या मंत्र्याच्या नावाने शासन निर्णय जाहीर करण्याचा हा आगळा वेगळा “विक्रम” आहे…!!

    Nawab Malik : “Minister without Account” in jail, but the ruling was announced as “Minority Minister” !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू

    Raj Thackeray : महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही; राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध