• Download App
    रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी खार्कीव मध्ये झालेल्या गोळीबारात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. |Nawab Malik ED: Faraz Malik seeks one week term on ED summons; ED rejects request !!; Faraj Gajaad at any moment

    Nawab Malik ED : ईडीच्या समन्सवर फराज मलिकने मागितली आठवड्याची मुदत; ईडीने फेटाळली विनंती!!; कोणत्याही क्षणी फराज गजाआड!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर जमीन खरेदी प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा केलेला सौदा नवाब मलिक यांना बराच महागात पडताना दिसतो आहे. ते स्वतः ईडीच्या कोठडीत आहेतच, पण आता त्यांचा मुलगा फराज मलिकला ईडीने समन्स पाठविले आहे.Nawab Malik ED: Faraz Malik seeks one week term on ED summons; ED rejects request !!; Faraj Gajaad at any moment

    ईडीच्या या समन्सवर फराज मलिकने कागदपत्रे सादर करायला आठवडाभराची मुदत मागितली. परंतु त्याची ही विनंती ईडीने फेटाळून लावली आहे. ईडीच्या चौकशीत नवाब मलिक सहकार्य करत नाहीत. उलट ते अधिकाऱ्यांना धमकावत आहेत. त्यामुळे ईडीने नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची चौकशी आणि तपास करायचे ठरवले आहे.



    त्यानुसार ईडीने त्यांचा मुलगा फराज मलिकला समन्स पाठवले. त्यावर फराज मलिक याने संबंधित व्यवहाराची कागदपत्रे सादर करण्यासाठी आठवडाभराची मुदत वकिलामार्फत मागितली. परंतु ईडीने फराज मलिकची ही विनंती फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता फराज मालिकेला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

     नवाब मलिकांचे चौकशीत ईडीला असहकार्य

    अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्या समवेत जमीन खरेदी प्रकरणात मनी लॉंड्रिंग गुन्ह्याखाली सध्या ईडीच्या कोठडीत असलेले नवाब मलिक हे चौकशीला सहकार्य करत नाहीत, त्यामुळे आता ईडीने मलिकांच्या घरातील सदस्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामध्ये आधी त्यांचा मुलगा फराज ईडीच्या रडारवर आला आहे.

    कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांना बुधवारी अटक केली. ईडीच्या कोठडीत त्यांना पोटदुखी झाली. त्यानंतर त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    दोन दिवसांनी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीतच आहेत. त्यांची ईडी कोठडीची मुदत 3 मार्च रोजी संपत आहे.नवाब मलिकांकडून तपासाला सहकार्य मिळत नसल्याने ईडीने त्यांचा मोर्चा त्यांचा मुलगा फराजकडे वळवला आहे.

    Nawab Malik ED: Faraz Malik seeks one week term on ED summons; ED rejects request !!; Faraj Gajaad at any moment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस