• Download App
    नवाब मलिक ४ एप्रिल पर्यंत कोठडीतच; मात्र कोर्टाच्या परवानगीने बेड आणि खुर्ची मिळेल!! Nawab Malik ED court bed chair

    Nawab Malik ED : नवाब मलिक ४ एप्रिल पर्यंत कोठडीतच; मात्र कोर्टाच्या परवानगीने बेड आणि खुर्ची मिळेल!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यांना 4 एप्रिल पर्यंत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र कोठडी त्यांना स्वतंत्र बेड आणि खुर्ची देण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे आहे. Nawab Malik ED court bed chair

    नवाब मलिक यांनी आपल्या पाठदुखीच्या तसेच अन्य आजारांचे कारण देऊन कोर्टाकडे विशेष बेड आणि खुर्ची देण्याची मागणी केली होती. ती कोर्टाने मान्य केली आहे. मात्र, कोठडीतून बाहेर काढण्यास कोर्टाने नकार दिला आहे.



    गोवाला कंपाउंडची जमीन 300 कोटींची

    ज्या जमीन व्यवहारात नवाब मलिक सध्या कोठडीत आहेत तो गोवावाला कंपाउंडचा जमीन व्यवहार नवाब मलिकांनी दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी केला होता. यात नवाब मलिकांचा त्यांचा मुलगा फराज मलिक देखील सामील होता. सुमारे तीन एकर जमीन 300 कोटी रुपयांची आहे, असे ईडीने कोर्टात स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा आणखी तपास करण्याची गरज असल्याचे ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. त्यामुळे नवाब मलिकांना कोठडी बाहेर काढण्यासाठी कोर्टाने नकार दिला आहे. 4 एप्रिल पर्यंत त्यांना कोठडीत राहावे लागणार आहे.

    Nawab Malik ED court bed chair

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr Neelam Gorhe : शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार, भगवा फडकणार, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विश्वास

    केवळ सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावर अजितदादांना घेरून ते वठणीवर येतील??

    सुरेश कलमाडींनी डिनर डिप्लोमसीत 64 खासदार जमवून आणले; पण शरद पवारांना ते टिकवून धरता का नाही आले??