प्रतिनिधी
मुंबई : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीची हवा खावा असलेल्या मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचे सर्व मंत्री आज मुंबईत 10.00 वाजता महात्मा गांधी पुतळ्यापाशी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने नवाब मलिक यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा त्यांचा आरोप आहे.Nawab Malik ED
– भाजपची निदर्शने
तर दुसरीकडे नवाब मलिक यांना केंद्र सरकारने नव्हे तर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे या मागणीसाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते विविध शहरांमध्ये निदर्शने करणार आहेत.
भाजपने आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीतील वनमंत्री वनमंत्री संजय राठोड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे भाग पडल्यानंतर महाविकास आघाडीतले मंत्री अधिक आक्रमक झाले. त्यामुळे त्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यास नकार दिला आहे. मात्र, या मुद्द्यावर भाजप देखील तितकाच आक्रमक असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याखेरीज राहणार नाही त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा पाठपुरावा करतच राहू तसेच संजय राऊत यांचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण देखील अर्धवट सोडणार नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
– फडणवीसांचा हल्लाबोल
नवाब मलिक यांचे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण राजकीय नाही, तर ते देशाच्या सुरक्षिततेची संबंधित आहे. या देशाचा शत्रू दाऊद इब्राहिम याच्याशी त्यांनी व्यवहार केला आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा न घेऊन महाविकास आघाडी देशात चुकीचा पायंडा पाडत आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई थांबणार नाही, असे ते म्हणाले आहेत.
Nawab Malik ED
महत्त्वाच्या बातम्या