प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्या समवेत जमीन खरेदी प्रकरणात मनी लॉंड्रिंग गुन्ह्याखाली सध्या ईडीच्या कोठडीत असलेले नवाब मलिक हे चौकशीला सहकार्य करत नाहीत, त्यामुळे आता ईडीने मलिकांच्या घरातील सदस्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामध्ये आधी त्यांचा मुलगा फराज ईडीच्या रडारवर आला आहे. Nawab Mailk refusal to ED inquiries brings his son Faraz on ED radar
सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत ईडी खासगी डॉक्टर किंवा एम्सच्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे त्यांचा मुलगा फराज याला या आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांच्यावर बुधवारी अटकेची कारवाई केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मात्र अटकेनंतर दोन दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. येथील उपचार आणखीन काही दिवस सुरु राहणार असल्याचे समजते.
नवाब मलिकांकडून तपासाला सहकार्य मिळत नसल्याने ईडीने त्यांचा मोर्चा त्यांचा मुलगा फराजकडे वळवला आहे. लवकरच त्यांना समन्स बजावून या आठवड्यात चौकशीला बोलावले जाऊ शकते, अशी माहिती ईडी सूत्रांनी दिली आहे.
Nawab Mailk refusal to ED inquiries brings his son Faraz on ED radar
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करून त्यांचीच फसवणूक, मुख्यमंत्र्यांसह मराठा मंत्र्यांनी राजीनामे देण्याची राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी
- शर्मीला ठाकरे म्हणतात, १५ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कानाखाली वाजवली म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर
- गाढ झोपून हा युवक मिळवितो लाखो रुपये, यू ट्यूबची कमाल
- Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट
- Kili Paul : किली पॉल-नीमा वर पंतप्रधान मोदी देखील फिदा ! त्यांच्या प्रतिभेचा आदर करत ‘मन की बात’मध्ये उल्लेख… म्हणाले भारतीय संगीताची जादू…