• Download App
    Radhanath Swami Maharaj नवरात्राच्या पावन पर्वात इस्कॉन

    Radhanath Swami Maharaj : नवरात्राच्या पावन पर्वात इस्कॉन प्रमुख राधानाथ स्वामी महाराज यांच्या हस्ते उद्या रामतीर्थावर गोदावरी महाआरती सोहळा!!

    Radhanath Swami Maharaj

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : Radhanath Swami Maharaj  शारदीय नवरात्राच्या पावन पर्वात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने उद्या (ता. 10 ऑक्टोबर) संत दर्शन सोहळा आणि श्री गोदावरी महाआरती आयोजित केली असून या महाआरतीला “इस्कॉन” या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख आणि “तुषार्त पथिक” या आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक पूजनीय संत राधानाथ स्वामी महाराज  ( Radhanath Swami Maharaj  ) विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या आणि “इस्कॉन” संस्थेचे दोन वरिष्ठ संत पूज्य गौरांग प्रभूजी आणि पूज्य शिक्षाष्टकम् महाराज यांच्या हस्ते श्री गंगा गोदावरीची सायंकाळी 6.30 वाजता महाआरती होणार आहे. त्याच वेळी संत दर्शन सोहळा समितीने आयोजित केला आहे.Radhanath Swami Maharaj



    नाशिककरांसाठी हा मोठा अनुपम्य सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने नाशिककरांनी रामतीर्थ गोदावरी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केले असून समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सोहळ्यासाठी मेहनत घेत आहेत.

    रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गेल्या आठ महिन्यांपासून नित्य नियमाने रामकुंडावर दुतोंड्या मारुतीपाशी रामतीर्थावर रोज सायंकाळी गोदावरी आरती आयोजित करत असून हजारो नाशिककर गंगा गोदावरीच्या प्रार्थनेसाठी आणि या आरतीचा लाभ घेण्यासाठी तिथे उपस्थित असतात.

    या महाआरतीसाठी आतापर्यंत समाजाच्या विविध स्तरातील गणमान्य व्यक्तींनी हजेरी लावली असून त्यामध्ये उद्योगपती, शासकीय तसेच खासगी संस्था, संघटनांमधील विविध अधिकारी, सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, आरोग्य, क्रीडा आणि अन्य सामाजिक संस्थांमधील सन्माननीय व्यक्ती यांचा समावेश आहे.

    Navratri, ISKCON chief Radhanath Swami Maharaj will perform the Godavari Mahaarti ceremony tomorrow on Ram Tirtha!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!