प्रतिनिधी
मुंबई : खासदार नवनीत राणा यांचा कोठडीत कोणत्याही प्रकारे छळ झाला नाही. त्यांना हीन वागणूक दिली नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे चहा पीत असल्याचे दिसत आहे.Navneet Rana: Video of Navneet Rana from Khar police station; A complaint of their misconduct was lodged at the Santa Cruz Police Station
मात्र, या संदर्भात नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी ताबडतोब खुलासा केला असून नवनीत राणा यांची मुळातली तक्रार खार पोलीस स्टेशन मधल्या वर्तणुकीबद्दल नव्हतीच, कारण खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना चहा देण्यात आला ही वस्तुस्थिती होती. परंतु त्यांना सांगता ग्रुप पोलीस स्टेशनच्या लोक मिळाले लॉकअपमध्ये मिळालेली वर्तणूक याविषयी त्यांनी तक्रार केली होती. तेथे त्यांना जातीच्या मुद्द्यावरून हिणवण्यात आले. पिण्यासाठी पाणी देण्यात आले नाही. तसेच वॉशरूमचा वापर करून देण्यात आला नाही, अशी त्यांची तक्रार आहे, असा व्हिडिओ रिझवान मर्चंट यांनी जारी केला आहे.
खासदार नवनीत राणा यांनी जेलमध्ये आपल्यासोबत हीन वागणूक केल्याचा आरोप पोलिसांवर केला होता. त्यावर वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. पाटील म्हणाले की, आतापर्यंतची कारवाई ही कायद्यानुसारच करण्यात आली आहे. राणांना कोठडीत हीन वागणूक दिल्याचा प्रकार घडलाच नाही. लोकसभेच्या सचिवांना राज्य सरकार अहवाल पाठवणार आहे, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
नवनीत राणांचे आरोप
नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिस आणि तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. दलित असल्याने आपल्याला पाणी दिले जात नाही आणि कारागृहातील शौचालय वापरण्याची परवानगी दिली जात नसल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी पत्रात केला होता. या पत्राची लोकसभा सचिवालयाने दखल घेतली असून यासंदर्भातील अहवाल 24 तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले.
नवनीत राणा यांच्या पत्रातील मुद्दे
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ‘हिंदुत्व’ तत्त्वांपासून पूर्णपणे भटकली आहे. त्यांनी जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली.
शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याच्या आशेने मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाईन आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर ‘हनुमान चालिसा’ पाठ करेन, अशी घोषणा केली होती. कोणताही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा हेतू नव्हता. खरे तर मी मुख्यमंत्र्यांना ‘हनुमान चालिसा’च्या जपासाठी आमंत्रित केले होते. माझी ती कृती मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हती.
माझ्या कामामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते हे लक्षात घेऊन, मी जाहीरपणे यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि जाहीर केले की मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला भेट देणार नाही. पण, त्यानंतरही मला आणि माझ्या पतीला घरात कैद केले.
मला 23.04.2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मी पोलीस ठाण्यात रात्र काढली. रात्रभर पिण्याचे पाणी अनेक वेळा मागितले. पण, मला पाणी देण्यात आले नाही.
तेथील पोलीस कर्मचार्यांनी मी दलित असल्याने मला एकाच ग्लासात पाणी देणार नसल्याचे म्हटले. हा माझ्यासाठी धक्का होता. अशा प्रकारे, माझ्या जातीच्या आधारावर माझा थेट छळ करण्यात आला आणि केवळ याच कारणासाठी मला पिण्याचे पाणी दिले गेले नाही.
मी दलित असल्याने या कारणावरुन पिण्याच्या पाण्यासारखे मूलभूत मानवी हक्क मला नाकारण्यात आले. तसेच मला रात्री बाथरूम वापरायचे असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. मला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आली. आम्ही खालच्या जातीतील लोकांना आमचे बाथरूम वापरू देत नाही, अशी पोलिसांनी मला सुनावले.
Navneet Rana: Video of Navneet Rana from Khar police station; A complaint of their misconduct was lodged at the Santa Cruz Police Station
महत्त्वाच्या बातम्या
- झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची पत्नीच्या मटण कंपनीला 11.5 एकर जमीन “भेट”!! मात्र कंपनीने जमीन सरकारला परत केल्याचा दावा!!
- महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून धूम स्टाइल पळून जाणारे आरोपी जेरबंद
- दोन डगरींवर हात, झाला घात : प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा डाव उधळला!!
- बीजिंगमध्ये दुकाने रिकामी, शांघायमध्ये एका दिवसात ५१ मृत्यू, कोरोना चाचणीसाठी रांगा