Monday, 5 May 2025
  • Download App
    नवनीत राणांना हीन वागणूक नाही; वळसे पाटलांचे स्पष्टीकरण; पोलिसांकडून व्हिडिओ जारी!!Navneet Rana is not treated badly; Valse Patal's explanation

    Navneet Rana : नवनीत राणांना हीन वागणूक नाही; वळसे पाटलांचे स्पष्टीकरण; पोलिसांकडून व्हिडिओ जारी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्यासोबत कोठडीत कोणत्याही प्रकारे छळ झाला नाही. त्यांना हीन वागणूक दिली नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे चहा पीत असल्याचे दिसत आहे.Navneet Rana is not treated badly; Valse Patal’s explanation

    खासदार नवनीत राणा यांनी जेलमध्ये आपल्यासोबत हीन वागणूक केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. त्यावर वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. पाटील म्हणाले की, आतापर्यंतची कारवाई ही कायद्यानुसारच करण्यात आली आहे. राणांना कोठडीत हीन वागणूक दिल्याचा प्रकार घडलाच नाही. लोकसभेच्या सचिवांना राज्य सरकार अहवाल पाठवणार आहे, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.



    राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीचा निर्णय हा दोन दिवसात होणार आहे. औरंगाबादचे आयुक्त याबाबत निर्णय घेतील. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई करणार असल्याचेही पाटील म्हणाले.

    नवनीत राणांचे आरोप

    नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिस आणि तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. दलित असल्याने आपल्याला पाणी दिले जात नाही आणि कारागृहातील शौचालय वापरण्याची परवानगी दिली जात नसल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी पत्रात केला होता. या पत्राची लोकसभा सचिवालयाने दखल घेतली असून यासंदर्भातील अहवाल 24 तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले.

    •  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ‘हिंदुत्व’ तत्त्वांपासून पूर्णपणे भटकली आहे. त्यांनी जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली.
    •  शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याच्या आशेने मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाईन आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर ‘हनुमान चालिसा’ पाठ करेन, अशी घोषणा केली होती. कोणताही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा हेतू नव्हता. खरे तर मी मुख्यमंत्र्यांना ‘हनुमान चालिसा’च्या जपासाठी आमंत्रित केले होते. माझी ती कृती मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हती.
    •  माझ्या कामामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते हे लक्षात घेऊन, मी जाहीरपणे यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि जाहीर केले की मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला भेट देणार नाही. पण, त्यानंतरही मला आणि माझ्या पतीला घरात कैद केले.
    •  मला 23.04.2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मी पोलीस ठाण्यात रात्र काढली. रात्रभर पिण्याचे पाणी अनेक वेळा मागितले. पण, मला पाणी देण्यात आले नाही.
    •  तेथील पोलीस कर्मचार्‍यांनी मी दलित असल्याने मला एकाच ग्लासात पाणी देणार नसल्याचे म्हटले. हा माझ्यासाठी धक्का होता. अशा प्रकारे, माझ्या जातीच्या आधारावर माझा थेट छळ करण्यात आला आणि केवळ याच कारणासाठी मला पिण्याचे पाणी दिले गेले नाही.
    •  मी दलित असल्याने या कारणावरुन पिण्याच्या पाण्यासारखे मूलभूत मानवी हक्क मला नाकारण्यात आले. तसेच मला रात्री बाथरूम वापरायचे असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. मला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आली. आम्ही खालच्या जातीतील लोकांना आमचे बाथरूम वापरू देत नाही, अशी पोलिसांनी मला सुनावले.

    Navneet Rana is not treated badly; Valse Patal’s explanation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा