नवी मुंबई महापालिकेने १९ जुलै २०१९ रोजी यासंदर्भातला ठराव मंजूर करून सरकारला पाठविलेला आहे. मात्र, त्यावेळी राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता होती.परंतु आता भाजप शिवसेना एकमेकांविरुद्ध आहेत.Navi Mumbai and Thane will also get property tax relief
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नुकतेच मुंबई महानगरपालिकेने ५०० फुटांच्या घरांची मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेने प्रस्ताव पाठवला
तर या भागातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तयारी सरकार करील, अशी घोषणा केली.नवी मुंबई महापालिकेने १९ जुलै २०१९ रोजी यासंदर्भातला ठराव मंजूर करून सरकारला पाठविलेला आहे. मात्र, त्यावेळी राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता होती.
परंतु आता भाजप शिवसेना एकमेकांविरुद्ध आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्रशासकांना ठराव पाठवायला सांगितले आहे.या घोषणेमुळे अन्य महापालिकांनी असेच प्रस्ताव पाठविले तर त्याविषयी सरकार काय करणार, अशी राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे.
Navi Mumbai and Thane will also get property tax relief
महत्त्वाच्या बातम्या
- NEW INDIA : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे अनोखे गिफ्ट! सरकारी कर्मचाऱ्यांना पालकांसोबत वेळ घालवण्यासाठी विशेष सुट्टी जाहीर
- शहरांची नावे बदलण्यात योगी आदित्यनाथांपेक्षाही अखिलेश यादव पुढे, आरटीआयमधून झाला खुलासा, वाचा सविस्तर…
- WATCH : त्यांच्या हातालाच नाही, तर मेंदूला पण लकवा चंद्रकांत पाटील यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका
- WATCH : मुख्यमंत्र्यांनी स्वत रस्त्यावर उतरून लोकांना वाटले मास्क, व्हिडिओ झाला व्हायरल, पाच राज्यांतील निवडणुकीमुळे इतर नेते मात्र गर्दी जमवण्यात दंग!