विशेष प्रतिनिधी
पुणे : शिक्षा संस्कृति उत्थान न्यासाची राष्ट्रीय प्रांत संयोजक बैठक आज श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, पुणे येथे सुरू झाली. या तीन दिवसीय राष्ट्रीय बैठकीत देशातील ४० हून अधिक प्रांतांमधून २०० पेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.National Provincial Coordinators’ Meeting of Shiksha Sanskriti Utthan Nyas begins in Pune; Brainstorming on National Education Policy, Indian Knowledge Tradition
बैठकीच्या उद्घाटन सत्रात शिक्षा संस्कृति उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुरेश गुप्ता, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) भिलाईचे संचालक प्रा. राजीव प्रकाश, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष प्रा. दीपक श्रीवास्तव, गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठ, बिलासपूरचे कुलगुरू प्रा. आलोक चक्रवाल, राजुल गज्जर, कुलगुरू प्रा. पीयूष रंजन, प्रा. वाजपेयी, राजेश वर्मा, राजेंद्र कुरारिया, राष्ट्रीय संयोजक ए. विनोद तसेच राष्ट्रीय सहसचिव सविता सेंगर यांच्यासह अनेक वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पदाधिकारी विशेष उपस्थित होते.
बैठकीच्या पहिल्या तीन सत्रांमध्ये शिक्षा संस्कृति उत्थान न्यासने गेल्या काही काळात देशभर आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. व्यवस्थापन शिक्षणातील भारतीय दृष्टिकोन या विषयावर गुजरात विद्यापीठाच्या मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्रात आयोजित सात दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली. या प्रशिक्षणात देशातील १० राज्यांतील शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते.
तसेच शिक्षक शिक्षण विषयावर महाराष्ट्रात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आलेल्या २२० संशोधन निबंधांचा आढावा घेण्यात आला. देशातील सहा राज्यांमध्ये आयोजित ज्ञान सभांच्या उपक्रमांची माहिती आणि त्यांचे परिणामही यावेळी मांडण्यात आले.
शिक्षा संस्कृति उत्थान न्यास सध्या विकसित भारत @ २०४७ साठी शिक्षण या विषयावर देशव्यापी अभियान राबवत आहे. या अभियानांतर्गत देशभर परिसंवाद, चर्चासत्रे आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. उद्योगपती, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एकत्र आणून विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षणाची भूमिका यावर ठोस कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.
बैठकीच्या पुढील सत्रांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारतीय ज्ञानपरंपरा, भारतीय भाषा, वैदिक गणित, संशोधन, शिक्षक शिक्षण आणि शिक्षणाच्या विविध आयामांवर सविस्तर चर्चा होणार आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून राष्ट्रीय स्तरावर सकारात्मक शैक्षणिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षा संस्कृति उत्थान न्यास सातत्याने कार्यरत आहे.
National Provincial Coordinators’ Meeting of Shiksha Sanskriti Utthan Nyas begins in Pune; Brainstorming on National Education Policy, Indian Knowledge Tradition
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासाठी जलसंधारणाच्या दिशेने मोठे पाऊल; दोन्ही ठिकाणच्या विशेष पथकाला फडणवीस सरकारची मंजुरी
- राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे; शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!
- AI च्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सध्या सर्वोत्तम काळ आणि संधी; AI क्षेत्रात नेतृत्वासाठी महाराष्ट्र सज्ज!!- मुंबई टेक वीक २०२६ चे उद्घाटन
- Amit Shah : ‘घुसखोरांना शोधून भारताबाहेर पाठवणार’; अमित शहांचा मोठा इशारा, सीमासुरक्षेवर केंद्र सरकार अधिक आक्रमक