• Download App
    राज्याभिषेक @350 : राजधानीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक, प्रतापगड प्राधिकरण, रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी ते कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव!! National Monument of Shivaji Maharaj in the capital, Pratapgad Authority

    राज्याभिषेक @350 : राजधानीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक, प्रतापगड प्राधिकरण, रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी ते कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव!!

    प्रतिनिधी

    मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर भव्य सोहळा आयोजित केला. या सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.National Monument of Shivaji Maharaj in the capital, Pratapgad Authority

    यामध्ये देशाची राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

    त्याचवेळी रायगडाच्या पायथ्याशी 45 एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्याची सूचना शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी केली. त्या सूचनेला ताबडतोब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता देऊन या शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला, तसेच मुंबईतील कोस्टर्ड रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचे त्यांनी जाहीर केले.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचे जतन आणि संवर्धन करण्याचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रम भूमी प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करून त्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

    रायगडावरच्या या दिमाखदार सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला संदेश दिला. एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारांचे प्रतिबिंब असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

    National Monument of Shivaji Maharaj in the capital, Pratapgad Authority

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!