वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणाऱ्या तौकते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या एनडीआरएफच्या ७९ टीम्स संबंधित राज्यांच्या किनारपट्ट्यांवर तयार ठेवण्यात आल्या असून अतिरिक्त २२ टीम्सची देखील गरज लागल्यास ताबडतोब मदतकार्यासाठी तयार राहण्याच्या स्थितीत आहेत. National Disaster Response Force (NDRF) has deployed/made available 79 teams in concerned states & 22 additional teams are also kept in readiness.
या चक्रीवादळामुळे सध्या केरळ, गोवा, मुंबईच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू आहे. हे वादळ हळूहळू गुजरातची किनारपट्टी और केंद्र शासित प्रदेश दादरा-नगर हवेलीच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. मुंबईत आज दुपारपासून जोरदार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासह गोव्यात बहुतांश पाऊस आणि वेगवान वारे वाहात आहेत. या वाऱ्यांचा वेग जवळजवळ ताशी 60 ते 70 किमी प्रति तास आहे.
हे वादळ वेगाने पुढे सरकत असून आज रविवारी संध्याकाळी मुंबई किनारपट्टीजवळून गुजरातकडे सरकणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे प्रभावित भागांत वेगवान वाऱ्यांसह मूसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीसह लगतच्या १५० किलोमीटर परिसराला पावसाने झोडपले आहे. मुंबई – ठाण्यानजीकच्या शहरांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे.
किनारपट्टीवरील मोक्याच्या जागांवर लष्कर, नौदल, आणि तटरक्षक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी नौदलाची हेलिकॉप्टर्स आणि बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना सुरक्षित राहण्यासंबंधीचे मार्गदर्शन सुरू आहे. चक्रीवादळ उद्या पहाटे गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
National Disaster Response Force (NDRF) has deployed/made available 79 teams in concerned states & 22 additional teams are also kept in readiness.
महत्त्वाच्या बातम्या
- जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासोच्या चित्राची ७०० कोटीना विक्री ; न्यूयॉर्कमध्ये लिलाव
- Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर एनडीआरएफ सतर्क, अनेक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता
- वांद्रेमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक, 19 मेपर्यंत कोठडी
- Maratha Reservation Issue : राज्यात पांढऱ्या पायाचे सरकार आल्याने मराठा आरक्षण झाले रद्द ठाकरे- पवार सरकारवर सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका