नाशिक : आज 10 जून शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन!! पण प्रत्यक्षात आज तो दोन ठिकाणी साजरा झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुण्यातल्या कार्यालयात पवार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा केला, तर अजित पवारांच्या समर्थकांनी मुंबईमध्ये कार्यक्रम साजरा केला. शरद पवारांबरोबरच्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातले लिबरल विश्वंभर चौधरी उपस्थित होते. जयदेव गायकवाड यांनी या सर्व नेत्यांचा सत्कार केला सर्वांनी शरद पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या. शरद पवारांनी छोटेखानी भाषणामध्ये कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आणि विधानसभा निवडणुकीसाठी अधिक निर्धाराने लढा देण्याचे आवाहन केले. National Congres Party sharadchandra pawar Anniversary today
अजित पवारांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज आपण काही जास्त बोलणार नाही. उलट जिथे अतिवृष्टी झाली आणि जिथे दुष्काळ आहे अशा ठिकाणांच्या विषयांसाठी आपण बैठका घेऊन मदत करण्याच्या सूचना देऊ, असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, रूपाली चाकणकर वगैरे नेते दिसले.
एरवी 10 जून हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी स्थापना दिनाच्या मोठ्या सेलिब्रेशनचा दिवस असायचा या कालावधीत शरद पवार पक्षाचे एखादे अधिवेशन घ्यायचे. परंतु आजच्या सेलिब्रेशन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन देण्यापेक्षा ब्रेकअपचे सेलिब्रेशन दिसले.
शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लकच नाही. कारण ती अजित पवार आपल्याबरोबर घेऊन गेले आहेत. परंतु पवारांची अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घेऊनही अजित पवारांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे वगळता एकही खासदार निवडून आणता आला नाही. त्याउलट शरद पवारांना स्वतःच्या नव्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आणता आले, पण मूळ पक्ष आपल्याबरोबर शिल्लक राहिला नाही. त्यामुळे पवारांना तुतारी चिन्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करावे लागले, तर अजित पवारांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पण लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या पक्षाचे पक्षाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करावे लागले.
मात्र या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ दोन संस्थापक तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा हजर नव्हते. कारण तारिक अन्वर सध्या काँग्रेसमध्ये आहेत आणि पी. ए. संगमा आता हयात नाहीत. त्यामुळे पवार काका पुतण्यांना ब्रेकअप झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे वेगवेगळे सेलिब्रेशन करावे लागले.
National Congres Party sharadchandra pawar Foundation Day program in Pune.
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा झाले भारताचे पंतप्रधान!
- सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत मोदींची नेहरूंच्या रेकॉर्डशी बरोबरी; नड्डा, शिवराज, मनोहरलाल यांच्या मंत्रिपदी शपथविधीने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची उत्सुकता वाढली!!
- Modi 3.0 : माध्यमांमधली पतंगबाजी सोडून सरकार नेमके काय आणि कसे बदलेल??, आर्थिक, सामाजिक अजेंडा कसा असेल??
- मणिपूरमध्ये वृद्धांच्या हत्येमुळे पुन्हा उसळला हिंसाचार; जिरीबाममधील 200 मैतेईंनी घरे सोडली