• Download App
    Swargate Rape Case राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वारगेट बलात्कार प्रकरणाची घेतली दखल , अध्यक्षा विजया रहाटकर यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

    राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वारगेट बलात्कार प्रकरणाची घेतली दखल , अध्यक्षा विजया रहाटकर यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याच्या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी या प्रकरणी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    पुण्यातील गजबजलेल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडल्याचे समोर आले आहे.

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया किशोर रहाटकर यांनी मुंबई पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. या घटनेप्रकरणी केलेल्या कारवाईसह एफआयआरची प्रत 3 दिवसांच्या आत पाठवण्यास राज्य महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना सांगितले आहे.

    आयोगाने या अमानुष गुन्ह्याचा तीव्र निषेध केला असून, आरोपी अद्याप फरार असल्याने सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, विजय रहाटकर यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना त्वरित पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत या प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करून कोणतीही दिरंगाई अथवा हलगर्जीपणा होणार नाही, याची खात्री करावी.

    पीडित महिलेस आवश्यक सर्व मदत, वैद्यकीय उपचार, मानसिक सल्ला आणि सुरक्षा पुरवावी. आरोपीला तातडीने अटक करून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी .तीन दिवसांत एफआयआरच्या प्रतीसह आयोगाला कारवाईचा अहवाल सादर करावा.

    महिला आयोगाने स्पष्ट केले आहे की, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आयोग कटिबद्ध आहे. कायद्याच्या कचाट्यातून असे गुन्हेगार सुटता कामा नयेत, यासाठी आयोग हा प्रकरणाचा बारकाईने पाठपुरावा करेल. सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी पावले उचलावीत, असे निर्देशही आयोगाने दिले आहेत.

    National Commission for Women takes suo motu cognizance of Swargate Rape Case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!