विशेष प्रतिनिधी
नाशिक : Corporate Jihad कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अत्यंत गोपनीय तपास सुरू केल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. प्रकरण गंभीर वळणावर गेले असून केंद्राकडून उच्चस्तरीय तपास सुरू केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून स्थानिक अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.Corporate Jihad
येथील एका नामांकीत आयटी कंपनी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, एका तरुणाच्या धर्मांतराचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. यामागे बड्या कार्पोरेट आयटी क्षेत्रातील नामांकीत कंपन्यामध्ये विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे नेटवर्क तयार करुन मोक्याची पदे काबीज केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.Corporate Jihad
मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून ठरावीक समुदायाला लाभ मिळून देण्याचा डाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयटी क्षेत्रात गुणवत्ता डावलून केवळ विशिष्ट ओळखीच्या आधारावर उच्च पदांवर नियुक्तीचे तपासात निष्पन्न झाले आहे.
परकीय निधी देणाऱ्या अदृश्य हातांचा शोध
केंद्रीय तपास यंत्रणेकडून नाशिकसह राज्य तसेच देशातील मोठ्या शहरातील बड्या कंपन्याच्या कागदपत्रांची छाननी सुरू करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. नाशिक डिफेन्स हब म्हणून ओळखले जाते. यात परकीय निधी पुरवल्याचीही शंका आहे. त्यामुळे शहरातील कॉर्पोरेट हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
Corporate Jihad: Central Agencies Launch Secret Probe into Nashik IT Firm Case
महत्वाच्या बातम्या
- वारकरी संप्रदायात घुसले होते अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार!!
- ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा; शिक्षणाचा नवा दीपस्तंभ!!
- Elon Musk : व्हॉट्सॲप वाचत आहे तुमचे खासगी मेसेज; मस्क म्हणाले- हे विश्वासार्ह नाही, कोर्टात भरपाईची मागणी
- SpiceJet : स्पाइसजेटमध्ये 20% कर्मचाऱ्यांची कपात होणार; वरिष्ठ अधिकाऱ्यांना जानेवारीपासून पगार मिळालेला नाही