• Download App
    नाशिक शहरात व्होट जिहादच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय निवासी सोसायट्यांच्या परिसरातील नागरिकांचे भरभरून मतदान!! nashik city median man voting

    नाशिक शहरात व्होट जिहादच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय निवासी सोसायट्यांच्या परिसरातील नागरिकांचे भरभरून मतदान!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिक आजच्या मतदानाच्या दिवशी शहर काझींनी 7 निकाह रद्द केले. मुस्लिमांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आणि त्यांना मतदानाचा टक्का वाढवायला सांगितले. या पार्श्वभूमीवर शहरातील वेगवेगळ्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय निवासी सोसायट्यांच्या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा आपला टक्का वाढविला. nashik city median man voting

    इंदिरानगर, राजीव नगर, चेतना नगर, पाथर्डी, शिव कॉलनी श्रद्धा विहार, दिपाली नगर या परिसरातल्या नागरिकांनी तसेच गंगापूर रोड, पाईपलाईन रोड, कॉलेज रोड, सावरकर नगर आदी परिसरांमध्ये नागरिकांमध्ये मतदानाची चेतना जागृत झाली आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर येऊन मतदानाचा टक्का वाढविला.

    मुंबईमध्ये तब्बल 37 मशिदींमधून व्होट जिहादचे आवाहन करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये देखील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न चालवला आहे.

    nashik city median man voting

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस