• Download App
    नसरुद्दीन शाह म्हणतात, द केरळ स्टोरी, गदर 2 हे सिनेमे मी पाहिले नाहीत, पण ते हिट झाल्याचा त्रास होतो!!|naseeruddin shah says about gadar 2 and the kerala story

    नसरुद्दीन शाह म्हणतात, द केरळ स्टोरी, गदर 2 हे सिनेमे मी पाहिले नाहीत, पण ते हिट झाल्याचा त्रास होतो!!

    प्रतिनिधी

    मुंबई : बरेच दिवस चर्चे बाहेर राहिल्यामुळे अस्वस्थ झालेले लिबरल जमातीचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी द काश्मीर फाईल्स, द केरळ स्टोरी आणि गदर 2 सिनेमांबद्दल आपली मते व्यक्त करून पुन्हा एकदा चर्चेत येण्याचा प्रयत्न केला आहे. हे तिन्ही सिनेमे भारतात आणि भारताबाहेर हिट झाल्याचे दुःख नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले आहे. वास्तविक द केरळ स्टोरी आणि गदर 2 हे सिनेमे आपण पाहिले नसल्याचे त्यांनी सांगितले. तरी देखील ते वाईट असल्याचा शिक्का मारून ते मोकळे झाले!!naseeruddin shah says about gadar 2 and the kerala story

    समाजातल्या प्रत्येक घडामोडीवर नसरुद्दीन शाह विशिष्ट वादग्रस्त भाष्य करत असतात पण माध्यमे त्या वक्तव्यांना बेधडक वक्तव्य म्हणून प्रसिद्धी देतात त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत द काश्मीर फाइल्स द केरळ स्टोरी गदर टू यांच्यासारखे सिनेमे भारतरत्न आणि भारत अभयार हिट कसे काय होऊ शकतात??, असा सवाल करत त्या सिनेमांवर ताशेरे ओढले.



    नसीरुद्दीन शाह यांनी तब्बल 17 वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलंय. ‘मॅन वुमन मॅन वुमन’ या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं असून त्याच्या प्रमोशनसाठी त्यांनी मुलाखत दिली.

    “आता फक्त देशावर प्रेम करणं पुरेसं नाही”

    बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्यामागचा उद्देश बदलला आहे का असा प्रश्न विचारला असता नसीरुद्दीन शाह यांनी मोकळेपणे आपलं मत मांडलं. “हो, आता तुम्ही जितके अधिक देशभक्त असाल, तितके अधिक तुम्ही लोकप्रिय व्हाल. कारण सध्या देशात त्याच गोष्टीचं राज्य आहे. आता फक्त तुमच्या देशावर प्रेम करणं पुरेसं राहिलेलं नाही. पण जोरजोरात ढोल वाजवून आणि काल्पनिक शत्रू निर्माण करून तुम्हाला ते सिद्ध करावं लागतंय. या लोकांना ही गोष्ट समजत नाहीये की ते जे करत आहेत ते खूप हानीकारक आहे.

    *केरळ स्टोरी, गदर 2 पाहिले नाहीत

    द केरळ स्टोरी आणि गदर 2 यांसारखे चित्रपट मी पाहिले नाहीत पण मला माहिती आहे की ते कशाबद्दल आहेत. ते आणि द काश्मीर फाइल्ससारखा चित्रपट इतका लोकप्रिय होत असल्याचे पाहून खूप त्रास होतो. दुसरीकडे सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा आणि हंसल मेहता हे जेव्हा चित्रपटांमधून सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना लोकप्रियता मिळत नाही. पण हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की असं असूनही ही लोकं चित्रपटांद्वारे त्यांच्या कथा सांगण्याचं काम थांबवत नाहीत.*

    ‘गदर 2’ सिनेमाबाबत नसीरुद्दीन शाह म्हणाले, “चांगले दिग्दर्शक हे चांगली पिढी घडवण्यासाठी जबाबदार असतात. 100 वर्षांनंतर लोक ‘भीड’ हा चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हा ‘गदर 2’ पाहतील, तेव्हा आपल्या काळातील कोणत्या चित्रपटातून सत्य मांडलंय हे ते जाणून घेतील. कारण चित्रपट हे एकमेव माध्यम आहे, ज्यामधून हे साध्य होऊ शकतं. आयुष्य जसं आहे तसं दाखवणं खूप कठीण आहे. त्यामुळे सध्या जे चाललंय त्याला प्रतिगामी हा अत्यंत सौम्य शब्द आहे.

    naseeruddin shah says about gadar 2 and the kerala story

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस