• Download App
    Obscene Video Controversy: Congress Demands Resignation of Minister Narhari Zirwal VIDEOS मंत्री नरहरी झिरवाळ शासकीय निवासस्थानात ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत कॅमेऱ्यात कैद, काँग्रेसकडून हकालपट्टीची मागणी

    Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवाळ शासकीय निवासस्थानात ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत कॅमेऱ्यात कैद, काँग्रेसकडून हकालपट्टीची मागणी

    Narhari Zirwal

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Narhari Zirwal राज्याच्या राजकीय वर्तुळात आज एका अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आला असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या व्हिडिओनंतर काँग्रेसने नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.Narhari Zirwal

    यासंबंधीच्या वृत्तानुसार, ट्रान्सजेंडर असलेल्या पवन यादव याच्यासोबत मंत्री झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ पवन यादव याचा भाऊ रवी यादव यांनी सार्वजनिक केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.Narhari Zirwal



    पवन यादव हा ट्रान्सवूमन असून खंडणी गोळा करण्याचा व्यवसाय करत असल्याचा भावाचा आरोप आहे. यासंदर्भात याआधीच पवन यादव यांच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात दमदाटी व खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर, पवन यादव याच्याशी संबंधित प्रकरणात इतर काही मंत्र्यांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

    दरम्यान, या कथित व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रकारांमुळे शासकीय निवासस्थानाच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारे शासकीय सुविधांचा गैरवापर केल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे. नरहरी झिरवाळ यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, या व्हिडिओची पुष्टी झालेली नाही.

    नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण – हर्षवर्धन सपकाळ

    राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाधक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

    एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे, असेही सपकाळ म्हणाले.

    जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

    याआधी झिरवाळ मंत्रालयातील लाचप्रकरणी आले होते अडचणीत

    मंत्री नरहरी झिरवाळ मागील महिन्यात देखील मंत्रालयातील लाचप्रकरणी अडचणीत आले होते. झिरवाळ यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगे यांना 50 हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार घडला होता. लाच घेतानाचा व्हिडिओ देखील समोर आला होता. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने राजेंद्र ढेरंगे यांना अटक केली होती. चक्क मंत्रालयात लाचखोरीची ही घटना घडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. राजेंद्र ढेरंगे यांनी झिरवाळ यांचे स्विय सहाय्यक रामदास गाडे यांच्या सूचनेनुसारच ही लाच घेतल्याचा दावा केला होता. त्यामुळे विरोधकांकडून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. तर या प्रकरणी आपला संबंध आढळला तर आपण तत्काळ राजीनामा देऊ अशी भूमिका मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केली होती.

    कोण आहेत नरहरी झिरवाळ?

    नरहरी सीताराम झिरवाळ यांनी ग्रामीण भागातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते वनारे गावचे सरपंच होते. नरहरी झिरवाळ यांनी विविध कार्यकारी संस्थांचे संचालक, चेअरमन पदे सांभाळली आहेत. झिरवळ यांचे शिक्षण कला शाखेपर्यंत झाले आहे. परंतु कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बिगारी काम करावे लागले होते. त्यानंतर दिंडोरी तहसील कार्यालयात लिपीक म्हणून ते कामाला लागले. परंतु, कामात मन न लागल्याने त्यांनी ती नोकरी सोडली. त्यानंतर गावात शेतीची कामे सुरू केली.

    नरहरी झिरवाळ यांनी जनता दलातून राजकारणाला सुरुवात केली. 1984 मध्ये ते वनारे गावचे सरपंच झाले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले आणि ते विजयी झाले. 2009 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु यावेळी शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा अवघ्या 149 मतांनी निसटता पराभव केला होता. त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 असे सलग तीन वेळा ते दिंडोरी मतदारसंघातून आमदार झाले आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवारांनी त्यांना मंत्रिपदाची संधी दिली.

    मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली होती उडी

    नरहरी झिरवाळ आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. धगनर समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाला नरहरी झिरवाळ यांनी सत्तेत असूनही विरोध केला होता. धनगर समाजाला शासनाने आरक्षण जरूर द्यावे, त्याला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, आदिवासींचे आरक्षण कमी करून धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचे झिरवाळ म्हणाले होते. यासाठी त्यांनी मंत्रालयात देखील आंदोलन केले होते. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून सरंक्षण जाळीवर उडी घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत हिरामण खोसकर, किरण लहामटे, काशीराम कोतकर आणि खासदार हेमंत सावरा होते. हे आंदोलन चांगलेच गाजले होते.

    Obscene Video Controversy: Congress Demands Resignation of Minister Narhari Zirwal VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : रोहित पवारांचे प्रसिद्धीसाठी माझ्यावर आरोप; अजितदादांच्या अपघातानंतर काय घडले ते सांगायला लावू नका, सुनील तटकरेंचा इशारा

    CM Fadnavis : अजितदादांचा घातपात असेल तर आकाशपाताळ एक करू; कोणाच्या बापालाही सोडणार नाही, CM देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

    Sunil Tatkare : मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल, सुनील तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा