• Download App
    Ajit Pawar's Strategist Naresh Arora Eyes Rajya Sabha Seat अजित पवारांचे सल्लागार अरोरा यांची राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी; दोन दिग्गज नेते मदत करत असल्याची चर्चा

    Naresh Arora : अजित पवारांचे सल्लागार अरोरा यांची राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी; दोन दिग्गज नेते मदत करत असल्याची चर्चा

    Naresh Arora

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Naresh Arora दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विधानसभा, महापालिका निवडणुकीतील राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर सुनेत्रा पवार लवकरच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी आपली वर्णी लागावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन दिग्गज नेते मदत करत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.Naresh Arora



    २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला जबर फटका बसला. त्यामुळे त्यांनी अरोरांच्या डिझाइन बॉक्स या संस्थेची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर अरोरा यांनीच लाडकी बहीण योजनेला महिलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी गुलाबी रंगाची थीम मांडली होती. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विधानसभेत अजित पवार गटाला मोठे यश मिळाले. तेव्हापासून अरोरा यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली आहे. सूत्रांनी सांगितले की, अरोरा यांच्या वतीने दोन दिग्गज नेत्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना सुनेत्रा पवारांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही म्हणून त्यांची बेचैनी वाढली आहे.

    Ajit Pawar’s Strategist Naresh Arora Eyes Rajya Sabha Seat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Govt : राज्य सरकारने थकीत शेतकरी कर्जदारांचा डेटा मागवला; आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत मोठी घोषणा शक्य

    अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर बदलले political dynamics; पण शरद पवारांच्या चेल्यांना बदल पचवायला जातोय जड!!

    बंजारा समाजातील मान्यवरांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सेवा पुरस्कार देऊन गौरव