• Download App
    नवी कृषि कायदे रद्द करण्याची नव्हे तर त्यात सुधारणा करण्याची गरज, शरद पवार यांच्या भूमिकेचे नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडून स्वागत|Narendra Singh Tomar welcomes Sharad Pawar's role in the need to amend the new Agriculture Act, not repeal it

    नवी कृषि कायदे रद्द करण्याची नव्हे तर त्यात सुधारणा करण्याची गरज, शरद पवार यांच्या भूमिकेचे नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडून स्वागत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन कृषि कायद्यांसंदर्भात व्यक्त केलेल्या भूमिकेचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्वागत केले आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.Narendra Singh Tomar welcomes Sharad Pawar’s role in the need to amend the new Agriculture Act, not repeal it

    तोमर म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तीन नवीन कृषी कायदे आणले आहेत. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हे कायदे रद्द करू नये असे म्हटले आहे. कायद्यांमधील ज्या मुद्द्यांवर आक्षेप आहे त्यात सुधारणा करण्याची भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.



    शरद पवार यांच्या भूमिकेशी केंद्र सरकार सहमत आणि त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. सरकारने या दृष्टीने ११ वेळा शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. कृषी कायद्यांवरून शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये निर्माण झालेला जो तिढा तो लवकरात लवकर सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

    केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून विविध शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. यात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी मोठ्या संख्येत सहभागी झाले आहेत. या नव्या कृषी कायद्यांना त्यांचा तीव्र विरोध आहे.

    आता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही हे कृषी कायदे रद्द करण्याऐवजी विरोध असलेल्या मुद्द्यांवर सुधारणा करण्याची भूमिक घेतली आहे.केंद्र सरकारचे तीन नवी कृषी कायदे रद्द करण्याची गरज नाही. त्या मुद्द्यांवर आक्षेप आहे त्यावर चर्चा करून कायद्यांमध्ये अपेक्षित सुधारणा करण्यात यावी, असं शरद पवार म्हणाले होते.

    Narendra Singh Tomar welcomes Sharad Pawar’s role in the need to amend the new Agriculture Act, not repeal it

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ