विशेष प्रतिनिधी
मुंबई : राम मंदिर ही काही भाजपची प्रॉपर्टी नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरेंच्या या टीकेचा भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाचार घेतला. नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे पागल हो गये है. उद्धव ठाकरे सोडल्यास राम मंदिर कोण बांधतंय हे संपूर्ण जग जाणून आहे. Narayan Rane took news on the criticism of Ram Mandir
राणे पुढे म्हणाले, भाजपची सत्ता आल्यावरच राम मंदिराचं काम सुरू झालं. उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली आहे. त्यामुळे त्यांना काय बोलावं हेच कळत नाही. त्याला काय अक्कल आहे. राम ही भाजपची प्रॉपर्टी नाही. राम देव आहेत. ती सर्वांचीच प्रॉपर्टी आहे, अशी खोचक आणि जोरदार टीका नारायण राणे यांनी केली.
राणेंच्या हस्ते हेमा मालिनी यांचा सत्कार
वांद्रे येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांना अटल बिहारी वाजपेयी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नारायण राणे यांच्या हस्ते हेमा मालिनी यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.
यावेळी त्यांनी निवडणुकीच्या सर्व्हेवरही भाष्य केलं. जनता काँग्रेस आघाडीसोबत नाही. उद्धव ठाकरे यांना विकृत बोलायला काहीच हरकत नाही. उद्धव यांच्यासोबतही जनता नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, असा दावाच नारायण राणे यांनी केला. कोण इंडिया आघाडी? आमचाही सर्वे झाला आहे. आम्हीच शंभर टक्के जिंकणार आहोत. पैसे देऊन करण्यात आलेल्या सर्व्हेवर आमचा विश्वास नाही, असं राणे म्हणाले.
फिटनेस कसा ठेवायचा हे शिकावं
यावेळी नारायण राणे यांनी हेमा मालिनी यांचं कौतुक केलं. हेमा मालिनी यांचं वय आता 75 आहे. हेमा मालिनी यांच्याकडून काही शिकायचं असेल तर फिटनेस कसा ठेवायचा हे शिकलं पाहिजे. सत्कार माणसाचा केला जातो. त्यांच्या गुणांचा सत्कार केला जातो. तो जाहीररित्या केला जातो. कारण बोध घेता येतो, असंही राणे म्हणाले.
Narayan Rane took news on the criticism of Ram Mandir
महत्वाच्या बातम्या
- मंबाजी – तुंबाजी : पवारांचे कुटुंब, त्यांची जबाबदारी; सामनाच्या अग्रलेखातून काका – पुतण्याबरोबरच शिंदे – पटेलांचीही धुलाई!!
- 78 वर्षांनंतर जपानची शस्त्रास्त्रे निर्यातीला मंजुरी, सुरक्षा बजेटमध्ये एकाच वेळी 16% वाढ
- माजी विद्यार्थ्यांनी IIT बॉम्बेला दिले 57 कोटी रुपये; निधीतून AI लॅब बनणार, शिष्यवृत्तीही दिली जाणार