• Download App
    नांदगाव : लष्करातील दोन जवानांचा अपघात , एकाचा मृत्यू तर एक जखमी। Nandgaon: Two Army personnel were killed and one was injured in an accident

    नांदगाव : लष्करातील दोन जवानांचा अपघात , एकाचा मृत्यू तर एक जखमी

    आज शवविच्छेदानंतर गोपाळ दाणेकर यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. Nandgaon: Two Army personnel were killed and one was injured in an accident


    विशेष प्रतिनिधी

    नांदगाव : नांदगाव (जि.नाशिक) येथे काल सांयकाळी जळगाव खुर्द जवळ राष्ट्रीय महार्गावर झालेल्या ऍपेरिक्षा व बुलेटचा अपघात झाला.दरम्यान या अपघातात तालुक्यातील चिंचविहीर येथील रहिवाशी असलेले लष्करातील जवान जखमी झालेत.या अपघातात गोपाळ दादा दाणेकर ( वय ३१) यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला.

    तर दुसरा जवान नयनेश बापू घाडगे (वय ३४ ) हे गंभीररीत्या जखमी झालेत.दरम्यान त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले. दरम्यान आज शवविच्छेदानंतर गोपाळ दाणेकर यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

    घटना काय घडली ?

    काल बोलठाण येथे दुपारी दोन वाजता सीमा सुरक्षा दलातील जवान अमोल पाटील यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला.दरम्यान अंत्यसंस्कारसाठी गोपाळ दाणेकर व नयनेश घाडगे हे उपस्थित राहिले.पुढे बोलठाण येथून आल्या नंतर ते गावी चिंचविहीरला गेले.



    दरम्यान सांयकाळी नांदगावला येत असताना जळगाव खुर्द येथील विराज लॉन्सच्या समोरील नव्या राष्ट्रीय महामार्गावरील वळणावर समोरून येणाऱ्या ऍपेरिक्षा आणि त्यांच्या बुलेटची धडक झाली.हा अपघात एवढा भीषण होता कि गोपाळ काणेकर यांचा जागेवरच मृत्यू झाला.

    सांयकाळी साडे सातच्या सुमाराला हा अपघात झाला.यावेळी
    अंधार असल्यामुळे अपघात कसा झाला व अपघातात कोण व्यक्ती आहेत हे कळू शकले नाही. नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर त्यांना उपचारासाठी आणल्यावर संपूर्ण माहिती समजली.

    लष्करातील एका जवानाला आज भावपूर्ण निरोप दिल्यानंतर त्याच सांयकाळी उशिरा घडलेल्या अपघातात पुन्हा लष्करातील दुसऱ्या जवानाला गमवावे लागल्याच्या घटनेमुळे तालुक्यातील चिंचविहीर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Nandgaon: Two Army personnel were killed and one was injured in an accident

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस