• Download App
    राहुल गांधींच्या शेगावच्या सभेत नानांकडून तुषार गांधींचे भाषण थांबवून त्यांचाच चुकीचा परिचय! Nana stopped Tushar Gandhi's speech at Rahul Gandhi's Shegaon meeting and misintroduced him

    राहुल गांधींच्या शेगावच्या सभेत नानांकडून तुषार गांधींचे भाषण थांबवून त्यांचाच चुकीचा परिचय!

    प्रतिनिधी

    शेगाव : आजच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या शेगाव मध्ये राहुल गांधींच्या झालेल्या जाहीर सभेच्या सुरुवातीलाच एक विचित्र प्रकार घडला. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे भाषण थांबवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तुषार गांधींचाच परिचय करून दिला, पण चुकीचा… तुषार गांधी हे महात्मा गांधींचे “पणतू” असताना नानांनी त्यांचा उल्लेख महात्मा गांधींचे “नातू” असा केला. Nana stopped Tushar Gandhi’s speech at Rahul Gandhi’s Shegaon meeting and misintroduced him

    वास्तविक तुषार गांधींनी आपल्या भाषणातच दोन महान नेत्यांचे पणतू असा उल्लेख करून आपला परिचय करूनच दिला होता. पंडित जवाहरलाल नेहरूंचे पणतू राहुल गांधी यांच्यासमवेत महात्मा गांधींच्या पणतूला चालण्याचा योग आला असे ते म्हणत होतेच… पण नानांनी त्यांचे भाषण नेमके तिथेच तोडले. त्यांना बाजूला केले आणि तुषार गांधींचा परिचय सुरुवातीला महात्मा गांधींचे नातू असा करून दिला.

    हे करताना नानांनी जाहीर सभेचा प्रोटोकॉल देखील पाळला नाही. वास्तविक कोणत्याही वक्त्याचा परिचय करून देताना त्याच्या भाषणाच्या मध्ये जाऊन परिचय करून देत नाहीत, तर भाषणाच्या सुरुवातीला परिचय करून देतात. पण इथे नानांनी त्या प्रोटोकॉलला फाटा देत तुषार गांधींचे सुरू असलेले भाषण थांबवले आणि लाईव्ह भाषणातच त्यांना बाजूला करून तुषार गांधींचा परिचय करून दिला. तो परिचय करून देताना ते हे महात्मा गांधींचे नातू आहेत असे म्हणाले आणि नंतर कोणी चूक लक्षात आणून देतात हे महात्मा गांधींचे पणतू आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाचे महत्व तुम्हाला कळावे आणि महात्मा गांधींचे रक्त त्यांच्यात आहे हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे बोलतो आहे, असे नाना वर म्हणाले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले.

    Nana stopped Tushar Gandhi’s speech at Rahul Gandhi’s Shegaon meeting and misintroduced him

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    मी बोलायचे ठरविले तर…; फडणवीसांचा अजितदादांना पुन्हा इशारा; महेश लांडगेंना बूस्टर डोस!!

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले