• Download App
    Nana patole काँग्रेसचे आमदार निवडून आलेत सोळा; शिंदे + दादांना मुख्यमंत्री करणार नाना, पण त्यांनी ही तर केली खरी पवारांशी "स्पर्धा"!!

    काँग्रेसचे आमदार निवडून आलेत सोळा; शिंदे + दादांना मुख्यमंत्री करणार नाना, पण त्यांनी ही तर केली खरी पवारांशी “स्पर्धा”!!

    नाशिक : बुरा न मानो, होली है!! होळीच्या दिवशी वेगवेगळ्या रंगात रंगून कोण कुठले विनोद करेल काही सांगता येत नाही त्यातच राजकारण्यांच्या विनोदांना असा काही बहर येतो, की ज्याचे नाव ते!!

    असाच एक विनोद काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. काँग्रेसचे आमदार निवडून आलेत सोळा; शिंदे + अजितदादांना मुख्यमंत्री करणार नाना; पण ही तर त्यांनी खरी पवारांशी केली स्पर्धा!! हा तो “विनोद” ठरला.

    नागपूर मध्ये होळीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना नानांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजपला सोडून महायुतीच्या बाहेर पडायची ऑफर दिली. पण ही ऑफर त्यांनी तेवढ्यापुरतीच मर्यादित ठेवली नाही. कारण अशा किरकोळ ऑफर मधून शिंदे किंवा अजित दादा आपल्याकडे येणार नाहीत हे नानांना माहिती म्हणूनच त्यांनी त्यापुढे जाऊन तुम्ही भाजपला सोडून आमच्याकडे या. तुम्हाला “मुख्यमंत्री” करतो, असे नाना म्हणाले.

    पण हे दोन नेते खरंच भाजपला सोडून आपल्याकडे आले तर त्यांना एकदम एकत्र कसे मुख्यमंत्री करता येईल??, हे लक्षात येताच नानांनी ऑफर मध्ये थोडा बदल करून टाकला. तुम्हाला आलटून पालटून मुख्यमंत्री करू, असे नाना म्हणाले. नानांची ही “ऑफर” खरी वाटावी म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना भीती देखील घातली. भाजप तुमचे पक्ष खाऊन टाकेल तुमचे पक्ष टिकणार नाही त्यामुळे तुम्ही वेळीच आमच्याकडे या असे मधाचे बोट नानांनी त्या दोघांना चाटवले.

    पण खरं म्हणजे या सगळ्या ऑफर मधून नानांनी शरद पवारांना “स्पर्धा” निर्माण केली. कारण आत्तापर्यंत दुसऱ्याला किंवा तिसऱ्याला मुख्यमंत्री करण्याचे “श्रेय” शरद पवारांनाच मिळत असे. भले त्यांना आपल्या लाडक्या कन्येला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवता आले नसेल किंवा अगदी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर देखील बसवता आले नसेल, पण पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्री करून दाखवलेच ना!!

    तसे आपणही स्वतः मुख्यमंत्री झालो नाही तरी इतरांना मुख्यमंत्री करू शकतो अशी “प्रेरणा” नानांनी पवारांकडून घेतली. पवारांकडून घेतलेल्या “प्रेरणेतूनच” नाना पुढे सरसावले आणि त्यांनी थेट एकनाथ शिंदे आणि अजितदादांना डायरेक्ट मुख्यमंत्री करायची ऑफर देऊन टाकली!! फक्त ही ऑफर देताना काँग्रेसचे आमदार मात्र फक्त सोळाच निवडून आलेत हे “सत्य” मात्र नाना विसरले. चालायचेच, बुरा ना मानो, होली हैं!!

    Nana patole’s real competition with Sharad Pawar to make others chief minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IPS अंजना कृष्णांना केलेल्या दमबाजीचा मुद्दा अजितदादांनी बासनात गुंडाळला; पण त्यांच्याच बहिणीने आणि पुतण्याने तो पुन्हा तापविला!!

    पडले तरी काँग्रेसचे नाक वर, वाढलेल्या टक्केवारीतून केली पराभवाची भलामण!!

    Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मुलगा झीशानचा सवाल- पोलिस मास्टरमाइंडला का पकडत नाहीत, अनमोल बिष्णोईला घाबरता का?