प्रतिनिधी
नागपूर – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या खात्यावर आक्षेप घेणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविल्याची बातमी व्हायरल झाली होती. परंतु, प्रत्यक्षात नानांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र नितीन राऊतांच्या ऊर्जा खात्याबद्दल नसून शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या खनिकर्म विभागाने काढलेल्या एका टेंडरबद्दल असल्याचे खुद्द नानांनीच स्पष्ट केले आहे. Nana patole`s letter bomb not against nitin raut, but against state Mining Corporation
सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या एका टेंडर प्रक्रियेवर नानांनी आक्षेप घेतला आहे. राज्य खनिकर्म महामंडळ रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जे कंत्राट देण्यात येणार आहे, त्याला स्थगिती देण्याची मागणी नानांनी केली आहे. महाजनको कंपनीला कोळसा पुरवणाऱ्या कोळसा वॉशिंगचे कंत्राट मिळविण्यात संजय हरदानी चालवत असलेली रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी गैरमार्गाने पात्र ठरल्याचा नानांचा आक्षेप आहे.
नाना पटोले यांना कॉँग्रेसश्रेष्ठींनी दिली समज, स्वबळाचा नारा पडला थंड
या महामंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना नानांनी शिवसेनेकडे असलेल्या महामंडळाच्या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नानांनी यांनी ऊर्जा विभागाच्या विरोधात पत्र लिहिल्याची बातमी व्हायरल होत होती. त्यावर खुद्द नानांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले. आपण ऊर्जा विभागा विरोधात पत्र लिहिल्याची बातमी पूर्णपणे असत्य आणि चुकीची आहे. आपले पत्र हे खनिकर्म महामंडळातील टेंडरबाबत आहे. या महामंडळाचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, असे नानांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.
Nana patole`s letter bomb not against nitin raut, but against state Mining Corporation
महत्त्वाच्या बातम्या
- टी-सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हत्याप्रकरणी अब्दुल राशिद दाऊद मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
- वारी पंढरीची : संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्याला 350 वारकऱ्यांना परवानगी
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं थोरातांचं वक्तव्य, पवार म्हणाले- तिन्ही पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा!
- शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- ‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवतो, 10 हजारांची फौज आणतो’
- पुणे हादरलं! नवविवाहित डॉक्टर दांपत्याची आत्महत्या, आधी पत्नीने, दुसऱ्या दिवशी पतीने घेतला गळफास