विशेष प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खोटे बोलण्याचे काम करतात, नाना पटोले हे मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल बोलून गावातील गाव गुंडा बद्दल बोलल्याचं सांगत ते खोटं बोलत आहेत, अशी टीका भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.Nana Patolein the role of Mr.Natwarlal, Criticism of Chandrasekhar Bavankule
पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मात्र, ते अंगावर आल्यानंतर घाबरून आपण गावगुंड मोदीबाबत बोलत असल्याची बतावणी केली. यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, नाना पटोले खोटे बोलत आहे. ते काँग्रेसची प्रतिमा घालवण्याचा काम करत आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रतिमा पटोले यांच्यामुळे मलिन झाली आहे.
मी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं तिथे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, पण ज्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं तिथे चारशे लोकांची उपस्थिती होती. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मी याविरोधात कोर्टात जाऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. गुन्हा दाखल झाल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
काँग्रेसचे खासदार कोल्हे यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी म्हटले ते कलाकार म्हणून काम करताय, दुसरीकडं नाना पटोले म्हणतात आम्ही सिनेमा चालू देणार नाही. त्यामुळे हा राजकीय सिनेमा बंद करा, पटोले यांना महात्मा गांधींवर प्रेम असेल तर सत्तेतून बाहेर पडा, अ सा टोलाही बावनकुळे यांनी मारला आहे.
नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अश्लिल नृत्याचे प्रकार उघडकीस येत आहे, या अवैध धंद्यांना ऊत आला आहे, बेकायदेशीरपणे सुरु असलेले धंदे, सट्टापट्टी याकडे पालकमंत्र्यांचा लक्ष नाही, पोलिसांनाही सगळ्या धंद्याची माहिती असून हफ्ते वसुली सुरू आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.
Nana Patolein the role of Mr.Natwarlal, Criticism of Chandrasekhar Bavankule
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाची नोंद
- सुभाषबाबूंचे होते डलहौसीशी घट्ट नाते तब्येत सुधारण्यासाठी केला होता सात महिने मुक्काम
- उत्पल पर्रिकर यांची माघार घेण्याची तयारी; पण भाजपपुढे टाकला पेच
- निवडणुकीअगोदरच कॉँग्रेसने उत्तर प्रदेशात मान्य केला पराभव, प्रियंका गांधी यांचे समाजवादी पक्षासोबत सत्तेचे खयाली पुलाव
- मुलींच्या लग्नाचे वय वाढणार असल्याने घबराट, मध्य प्रदेशात मुस्लिमांमध्ये निकाहच्या प्रमाणात ७०० टक्के वाढ