• Download App
    Nana patole म्हणे, नानांची शिंदे + अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची "ऑफर"; पण हा तर खरा ठाकरे + पवारांना महाविकास आघाडीतून डच्चू!!

    म्हणे, नानांची शिंदे + अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची “ऑफर”; पण हा तर खरा ठाकरे + पवारांना महाविकास आघाडीतून डच्चू!!

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांना भाजपपासून दूर होत काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होण्याची “ऑफर” दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात दुसऱ्या किंवा तिसऱ्या नेत्याला “मुख्यमंत्री करणाऱ्या” शरद पवारांना “स्पर्धा” निर्माण झाली. पण त्या पलीकडे जाऊन नानांनी शिंदे आणि अजितदादांना दिलेली ऑफर खरी की खोटी, यापेक्षा त्यांनी महाविकास आघाडीतून ठाकरे आणि पवारांना डच्चू दिला ही चर्चा जास्त रंगली.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्र पत्रकार परिषदेत खुर्च्यांची अदलाबदली आणि एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली. आता या विधानवरुन चर्चांना उधाण आलेले असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक मोठे विधान केले. नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. भाजपला सोडा. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे नाना पटोलेंनी म्हटले. त्यामुळे राजकीय वातावरण तापले.

    नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेत्यांना बुरा न मानो होली है म्हणत खास शैलीत शुभेच्छा दिल्या. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांची प्रकृती ठीक व्हावी, असे म्हटले. आजकाल ते खूप फेकतात त्यांनी मोदींप्रमाणे खोटं बोलू नये, असा सल्ला दिला. आधी जे देवेंद्र फडणवीस होते, राज्यासाठी त्यांची लढाई चालायची. ते त्यांनी करावं अश्या शुभेच्छा देतो”, असे नाना पटोले म्हणाले.

    नाना म्हणाले :

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससोबत येण्याची ऑफर देतो‌. त्यांची अवस्था फार वाईट आहे. पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहिती नाही. भाजप त्यांना जगू देत नाही. अजित पवार यांनी सादर केलेले बजेट त्यांच्या मनातील बजेट नाही. हे बजेट बिना-पैशाचे आहे.

    एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली, त्यांच्या सगळ्या योजना बंद केल्या जात आहे. त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली. पण भाजपच्या लोकांची आहे. त्यामुळे त्यांनी त्यातून शिकावं. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी आमच्यासोबत यावं, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागली आहे. आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू. अजित पवार यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू.

    महाविकास आघाडीत संजय राऊत यांच्या रूपाने अतिविद्वान व्यक्तीमत्त्व महाराष्ट्राला लाभलं आहे. ते वेगवान नेते आहेत. विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत. सुपरफास्ट आहेत त्यांनी आणखी मोठं व्हावं, सुसाट पळावे.

    Nana patole offers chief ministership to Eknath Shinde and Ajit Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस