प्रतिनिधी
औरंगाबाद : महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका जरी सध्या लांबणीवर पडल्या असल्या तरी राजकीय पक्षांचे मेळावे आणि पक्षप्रवेश मात्र जोरात सुरू आहेत. पक्ष प्रवेशांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत. असाच एक पक्ष प्रवेशाचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.Nana Patole of Matka King Abed Pathan of Aurangabad entry congress
औरंगाबाद जिल्ह्यातील मटका किंग आबेद कासम पठाण याला काँग्रेसने एका समारंभात पक्ष प्रवेश दिला आहे. या समारंभाला मुख्य पाहुणे म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर होते. त्यांच्या हजेरीत औरंगाबादच्या मटकाकिंगला काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
परभणीतल्या काँग्रेस मेळाव्यात पक्ष प्रवेश
परभणीत काँग्रेसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात चक्क औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कुख्यात मटका किंग आबेद कासम पठाणला काँग्रेसने पक्षात प्रवेश दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या पक्षप्रवेश समारंभाला हजर होते.
मटकाकिंग विरुद्ध गुन्हे
मटकाकिंग अबेद कासम पठाण यांचा काँग्रेस प्रवेश १२ मार्च रोजी झाला आहे. तो पैठण येथील मटका किंग म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
तीन पोलीस निलंबित
आबेद पठाण हा पैठण शहरात मटका चालवतो. यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात ३ फेब्रुवारी रोजी सुद्धा त्याला विनापरवाना बेकायदेशीर कल्याण नावाचा जुगाराच्या ( मटका ) कारवाईत अटक करण्यात आली होती. तर २०२० मध्ये याच मटका किंग आबेदसोबत पैठणचे तीन पोलीस कर्मचारी भारत-ऑस्ट्रोलिया क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडीयमवर गेले होते. तसेच क्रिकेट सामना पाहताना त्यांनी सोशल मिडियावर स्वत:चे फोटो अपलोड केले. त्यानंतर ही बाब तत्कालीन पोलीस अधिक्षकांना समजताच त्यांनी तिघांना तडकाफडकी निलंबीत केले होते.
Nana Patole of Matka King Abed Pathan of Aurangabad entry congress
महत्त्वाच्या बातम्या
- होळीच्या रंगात मिसळले “राजकीय रंग”!!
- Hijab Controversy : हिजाबच्या हट्टापायी एकदा परीक्षा सोडून गेलात तर पुन्हा परीक्षेला बसता येणार नाही!!
- नाशिकमध्ये आता महिला वाहकांचे तिकीट प्लिज; महापालिकेच्या बससेवेत लवकरच १०० महिला
- गोव्यानंतर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार; नितीन गडकरी अन् देवेंद्र फडणवीसांचा निर्धार