• Download App
    निष्ठा की...??; नाना माझे दैवत, 10 वेळा त्यांचे पाय धुवेन; कार्यकर्त्याचे प्रत्युत्तर!! Nana Patole Feet Washed By Supporter Vijay Gurav In Akola Says He Is God For Me

    निष्ठा की…??; नाना माझे दैवत, 10 वेळा त्यांचे पाय धुवेन; कार्यकर्त्याचे प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी

    अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याचा मुद्दा महाराष्ट्रात तापल्यावर नाना पटोले सोशल मीडियात ट्रोल झाले. राजकीय वर्तुळात धुतले गेले, पण नानांचे पाय धुणारे कार्यकर्ते विनोद गुरव काही काळ नॉट रिचेबल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र गुरव आता समोर आले असून “नाना पटोले माझे दैवत आहेत, एकदाच काय, पण 10 वेळा मी त्यांचे पाय धुवेन” असे उत्तर त्यांनी टीकाकारांना दिले. त्यामुळे या प्रकाराला निष्ठा म्हणायचे की काही अन्य काही म्हणायचे??, असा सवाल सोशल मीडियातून केला जातोय. Nana Patole Feet Washed By Supporter Vijay Gurav In Akola Says He Is God For Me

    विजय गुरव म्हणाले :

    नानाभाऊ पटोले माझे दैवत आहेत, एकदा नाही 10 वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकीन. नाना पटोले वाडेगावला एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी ते पोहोचले. पोलिसांनी सांगितलं की गाडी आतपर्यंत जाईल, मात्र नानांनी सांगितलं की सर्वसामान्य भक्तांप्रमाणे पायी जाणार. श्रींचं दर्शन घेतल्यानंतर भाऊंचे पाय चिखलाने भरल्याचं मला दिसलं. म्हणून मी पाणी आणून त्यांच्या पायावर टाकू लागलो, तर त्यांनी मला मनाई केली होती, तरीही मी त्यांचे पाय धुतले.

    – राम कदम, अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांना माझं आवाहन आहे, नानाभाऊ पटोले माझे दैवत आहेत, मी एकदाच नाही, 10 वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकीन. माझ्या कुटुंबाबाबत किंवा नानांबाबत कुठलंही राजकारण करु नका. याच कार्यक्रमात नानांनी एका वृद्ध महिलेला हाताला धरुन स्टेजवर नेलं आणि साडीचोळी देऊन तिचा सत्कार केला, हे मीडियाने का दाखवलं नाही??

    नाना पटोले यांचे पाय धुणारे कार्यकर्ते विजय गुरव हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहेत. नाना पटोले यांनी कार्यकर्त्याच्या हाताने स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे टीकेचे धनी बनले. पण ज्या विजय गुरव यांनी नानांचे पाय धुतले, त्यांनी स्वतः मात्र पाय धुण्याचे समर्थन केले.

    Nana Patole Feet Washed By Supporter Vijay Gurav In Akola Says He Is God For Me

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : भुजबळांचा सवाल- आम्ही लहान समाजात जन्मलो हे आमचे पाप आहे का? ओबीसींना आत्महत्या न करण्याचे आवाहन

    मनसेला संभाजी ब्रिगेड + वंचित आघाडीच्या पंक्तीत बसविणे शिवसैनिक + मनसैनिकांचा ठरेल अवसानघात; वेळीच ओळखावा आघात!!

    माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, लॉजिस्टिक हब आणि अन्य उद्योगांच्या उभारणीसाठी महाराष्ट्रात सामंजस्य करार; 108599 गुंतवणूक, 471000 रोजगार निर्मिती!!