प्रतिनिधी
मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे परवाचे लोणावळ्याचे भाषण भाजप नेत्यांना टोचण्यापेक्षा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनाच जास्त टोचले आहे. आज त्यांच्या भाषणातला निवडक भाग उचलून जेव्हा सोशल मीडियावरून फिरवण्यात आला, तेव्हा अजित पवार भडकले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची बातमी आली. Nana patole controversial statement; after ajit pawar shiv sena MP arvind sawant also targets nana patole
आता अजितदादा नानांवर भडकलेत म्हटल्यावर शिवसेना नेते कसे काय मागे राहतील… त्यांनीही नानांवर रेशन घेतले आहे. वास्तविक अजितदादा भडकण्याची बातमी येण्यापूर्वी नानांनी आपण मुख्यमंत्र्याविरोधात बोललो नसल्याचा खुलासा केला होता. पण त्यानंतर अजितदादा भडकल्याची बातमी आली आणि आता शिवसेना नेत्यांनी देखील नानांना कानपिचक्या दिल्याची बातमी आली आहे.
न्यूज 18 लोकमतशी बोलताना शिवसेना प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी नाना पटोले यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. नाना पटोले हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे आपण काय बोलतोय याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. नाना पटोले यांना जे काही बोलायचे आहे ते त्यांनी खाजगीत बोलावे. चव्हाट्यावर बोलू नये, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.
अरविंद सावंत म्हणाले, की तुम्हाला काही अडचण असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगा. पण असे वक्तव्य करणे योग्य नाही. आपल्या वक्तव्यांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही. याचा विचार केला पाहिजे, त्यांना कसं थांबवायचं हे आता त्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी पुस्ती सावंतांनी जोडली.
-नबाब मलिकांनीही सुनावले
नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली जात नाही. जो नेता असतो त्याच्या माहिती घेतली जाते. नाना पटोले यांनी ही माहिती करून घ्यावी. आवश्यकता वाटली तर याबद्दलची माहिती त्यांनी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून घ्यावी. त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी तसा अर्ज करावा, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नानांना लगावला.
Nana patole controversial statement; after ajit pawar shiv sena MP arvind sawant also targets nana patole
महत्त्वाच्या बातम्या
- भारताच्या नव्या कायद्याची ट्विटरकडून अंमलबजावणी सुरू, १३३ पोेस्ट हटविल्या, १८ हजार अकाऊंटस केली निलंबित
- Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!
- समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?
- लसीकरण झालेले नाही, तिसरी लाट तोंडावर; शाळा सुरू करण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिकूल