• Download App
    Nana patole and rohit pawar पोस्टरवरच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्राणावर बेतले, पण बोटांवर निभावले!!

    Nana patole and Rohit pawar पोस्टरवरच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्राणावर बेतले, पण बोटांवर निभावले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Nana patole and rohit pawar पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्राणावर बेतले होते, पण बोटांवर निभावले, अशी म्हणायची वेळ महाविकास आघाडीतल्या पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांवर काल आली.

    शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्राचे नेतृत्व देऊ इच्छित होते, ते बाळासाहेब थोरात संगमनेर मधून पडले. कराड उत्तर मधून पृथ्वीराज चव्हाण हरले. अमरावतीतून यशोमती ठाकूर पराभूत झाल्या. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार कसेबसे विजयी होऊन विधानसभेत पोहोचले. नानांचा साकोलीतला विजय फक्त 258 मतांनी साकार झाला, तर रोहित पवार कर्जत जामखेड मधून अवघ्या 1043 मतांनी जिंकले. नाना पटोले आणि रोहित पवारांच्या राजकीय प्राणावरच बेतले होते, ते बोटांवर निभावले. त्यांचा राजकीयदृष्ट्या शाहिस्तेखान झाला.

    हे तेच नाना पटोले होते, ज्यांनी साकोली मतदारसंघात तुम्ही भावी मुख्यमंत्र्यांना मतदान करत आहे, असा प्रचार केला होता. त्याचबरोबर नानांच्या समर्थकांनी लाडूंवर भावी मुख्यमंत्री नाव लिहून त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. ते नाना फक्त 258 मतांनी जिंकले.

    रोहित पवारांचे देखील फारसे वेगळे घडले नाही. रोहित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून समर्थकांनी रस्त्या रस्त्यांवर पोस्टर झळकवली होती. या रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे 85 आमदार निवडून आणून शरद पवारांना 85 व्या वाढदिवसाची भेट द्यायची होती. पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला मूळातच महाविकास आघाडीत लढायला 87 जागा आल्या. त्यातून 85 जागा निवडून आणण्याचे तर दूरच राहिले. पवारांच्या आमदारांची संख्या 10 वर आली.

    Nana patole and rohit pawar won with thin margin

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!