• Download App
    पुण्यामधील उद्यानाला प्रभू श्री रामचंद्राचे नाव, महापालिकेचा निर्णय; शहराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन । Name of Lord Shri Ramchandra for the park in Pune, decision of Municipal Corporation; The foundation stone laid by city BJP chief 

    पुण्यामधील उद्यानाला प्रभू श्री रामचंद्राचे नाव, महापालिकेचा निर्णय; शहराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यातील उद्यानाला प्रभू श्री रामचंद्राचे नाव देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून उद्यानाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते पार पडला. विमानगर येथील नव्या विमानतळ मार्गावर हे उद्यान साकारणार आहे. Name of Lord Shri Ramchandra for the park in Pune, decision of Municipal Corporation; The foundation stone laid by city BJP chief

    धनकवडी येथील आंबेगाव पठार येथे उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलात प्रभू रामचंद्र यांचे शिल्प उभारण्याचा निर्णय नुकताच महापालिकेने घेतला होता. त्यानंतर आता उद्यानाला सुद्धा रामाचे नाव देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.



    भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते उद्यानाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम मंगळवारी थाटात झाला. एक एकर क्षेत्रात हे उद्यान साकारणार आहे. जॉगिंग ट्रक, लॉन, बैठक व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृह आणि सुरक्षा चौकी यांनी हे उद्यान परिपूर्ण असणार आहे. त्यासाठी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती भाजपचे नेते अर्जुन जगताप यांनी दिली. त्यांची पत्नी आणि नगरसेविका मुक्ता जगताप यांनी उद्यानासाठीचा प्रस्ताव दिला होता.

    महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर शहरातील विकासकामांना प्रोत्साहन देण्यात आले. उद्यान तयार करून प्रभू रामाचे नाव उद्यानाला देण्याचे ठरविल्या बद्दल जगताप यांचे कौतुक मुळीक यांनी यावेळी केले.

    गेल्या महिन्यात ३ ऑगस्टला आंबेगाव पठार येथील क्रीडा संकुलात २ कोटी खर्च करून प्रभू रामाचे शिल्प सकरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. नगरसेविका वर्षा तापकीर यांनी त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.

    Name of Lord Shri Ramchandra for the park in Pune, decision of Municipal Corporation; The foundation stone laid by city BJP chief

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!