• Download App
    Namaz at Shaniwar Wada after Saras Bagh; Are the Hindutva सारसबागेपाठोपाठ शनिवार वाड्यात नमाज पठण;

    सारसबागेपाठोपाठ शनिवार वाड्यात नमाज पठण; पुण्यातले हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन झोपलेय का??

    Shaniwar Wada

    नाशिक : तळ्यातला गणपती सारसबाग इथे नमाज पठणाचा संतप्त प्रकार घडल्यानंतर त्या पलीकडे जाऊन काही जिहाद्यांनी हिंदवी स्वराज्य आणि मराठा साम्राज्याचे प्रतीक असलेल्या शनिवार वाड्यात जाऊन नमाज पठण केले. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शनिवार वाड्यातला नमाज पठणाचा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्यासमोर आंदोलन केले शनिवार वाड्यात नमाज पठण होत असताना पोलीस प्रशासन झोपले होते का??, असा परखड सवाल केला.Namaz at Shaniwar Wada after Saras Bagh; Are the Hindutva

    सारसबाग आणि शनिवार वाडा ही पुण्यातली अभिमानास्पद वारसा स्थळे आहेत. पुण्याचे ऐतिहासिक वैभव आहेत. सारसबागेत तळ्यातला गणपती आहे पण शनिवार वाडा हा ऐतिहासिक स्मारक आहे, ते धार्मिक स्थळ नाही. तरी तिथे काही जिहादी तत्वांनी जाऊन नमाज पठण केले. याविषयी मेधा कुलकर्णी आणि सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या सगळ्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. ऐन दिवाळी सणाच्या काळात शनिवार वाड्यावरच्या ऐतिहासिक वैभववाच्या स्थळावर नमाज पठणासारखा प्रकार करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा जिहादी तत्वांचा प्रयत्न उघड्यावर आला.



     

     

    – पोलीस आणि प्रशासनावर पकड नसेल, तर काय उपयोग??

    पुण्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर एके काळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व होते. त्यावेळी सारसबाग किंवा शनिवार वाडा इथे नमाज पठणासारखे प्रकार झाल्याचे समोर आले नव्हते. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे राजकीय आणि सामाजिक वर्चस्व घटून पुण्यात भाजप आणि हिंदुत्ववादी तत्त्वांचे वर्चस्व निर्माण झाल्यानंतर हिंदू प्रतीके असलेल्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवर नमाज पठणाचे किंवा जिहादी तत्वांच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे प्रकार वाढले. सारसबागेला तर मुद्दामून तसे वादग्रस्त स्वरूप देण्यात आले. परंतु, पुण्यामध्ये भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी तत्त्वांचे राजकीय आणि सामाजिक वर्चस्व असले तरी पोलीस आणि प्रशासनावर पुरती पकड नाही, हेच यातून स्पष्ट होते. पुण्यात आज भाजपचे 5 आमदार, 2 खासदार, त्यापैकी एक केंद्रीय राज्यमंत्री एवढे सगळे राजकीय पाठबळ असताना पुण्यातल्या पोलीस आणि प्रशासनावर या सगळ्यांची पकड नसेल तर त्यांचा काय उपयोग??, असा सवाल संतप्त पुणेकर विचारत आहेत.

    – धंगेकर विरुद्ध मोहोळ

    पुण्यात सध्या जैन बोर्डिंगच्या वास्तूच्या विक्रीचा व्यवहार वादग्रस्त ठरलाय. रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे दोन हिंदुत्ववादी नेतेच एकमेकांसमोर उभे ठाकलेत. दोघांचेही वैयक्तिक राजकारण परस्पर विरोधी झाल्याने दोन हिंदुत्ववादी नेतेच एकमेकांच्या समोर उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. पुण्यातल्या हिंदुत्ववादी नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना एकमेकांची वाभाडे काढण्याशिवाय दुसरे उद्योग नाहीत का??, त्यांना एकमेकांच्या तंगड्या खेचण्याखेरीज दुसरे राजकारण करता येत नाही का??, त्यांना हिंदुत्ववादी प्रतीकांवरचे जिहादी आक्रमण दिसत नाही का??, असेही संतप्त सवाल पुणेकरांनी केले आहेत.

    Namaz at Shaniwar Wada after Saras Bagh; Are the Hindutva representatives and police administration in Pune asleep??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    धाराशिव मधल्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दिवाळी साजरी!!

    96 लाख लोक मतदार याद्यांमध्ये घुसविल्याचे गौडबंगाल; राज ठाकरेंना महाविकास आघाडीला निवडणुकीवर बहिष्कार घालायच्या दिशेने खेचायचेय काय??

    Girish Mahajan : मराठा आरक्षणाच्या जीआरचा निर्णय सरकारचा; कोणाला टार्गेट करणे योग्य नाही, भुजबळांच्या टीकेनंतर विखेंच्या साथीला गिरीश महाजन