विशेष प्रतिनिधी
नाशिक : एनसीसीएफ (NCCF) आणि ‘नाफेड’च्या (NAFED) माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय, केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती, ‘एनसीसीएफ’ च्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी नाशिकमध्ये दिली. NAFED and NCCF to buy 2 lakh metric tonnes of onion from Maharashtra
देशातील 65 ते 70 टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचे श्रीमती चंद्रा यांनी सांगितले. नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ‘एनसीसीएफ’ आणि नाफेडमार्फत अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. ‘एनसीसीएफ’ने 2 लाख 89 हजार 848 मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये नाफेड आणि ‘एनसीसीएफ’कडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार असल्याचेही चंद्रा यांनी सांगितले.
‘एनसीसीएफ’च्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नाशिक अशा 114 शहरांमध्ये 1 हजार 155 मोबाइल व्हॅनद्वारे 25 रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू केली आहे. कांदा, गव्हाचे पीठ, डाळींपाठोपाठ ‘एनसीसीएफ’तर्फे मूगडाळ आणि तांदूळदेखील अत्यल्प दरात विक्री करणार असल्याची माहिती चंद्रा यांनी यावेळी दिली.
NAFED and NCCF to buy 2 lakh metric tonnes of onion from Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- INDI आघाडीतल्या एका वृद्ध नेत्याचा पोक्त सल्ला; दुसऱ्याच्या भाषणात बेटकुळ्या!!
- इन्स्टा स्टार प्रिया सिंहवर कार घालणारा आरोपी अश्वजीत गायकवाडला अटक; लँड रोव्हरही जप्त
- भारतावर निर्बंध लादण्याची अमेरिकेतील सरकारी एजन्सीची मागणी; म्हटले- भारतात धार्मिक स्वातंत्र्य नाही
- पाक लष्करप्रमुख म्हणाले- काश्मीरबाबत भारताचा निर्णय अवैध; संयुक्त राष्ट्रप्रमुखांकडे काश्मिरींच्या इच्छेनुसार तोडगा काढण्याची मागणी