• Download App
    नबाब मलिक मंदबुध्दी असलेले नेते, समीर वानखेडे यांच्या बहिणीचा आरोप|Nabab Malik is retarded leader, Sameer Wankhedes sister accused

    नबाब मलिक मंदबुध्दी असलेले नेते, समीर वानखेडे यांच्या बहिणीचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नवाब मलिक मंदबुद्धी असलेले नेते आहेत. रोज सकाळी नवाब मलिक ट्विटरवर काहीबाही आरोप करतात. कधी माझ्यावर आरोप करतात, कधी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप करतात. त्यांना हे त्यांना आवडतं का? अशी टीका समीर वानखेडे यांच्या बहिण यास्मिन वानखेडे यांनी केली आहे.Nabab Malik is retarded leader, Sameer Wankhedes sister accused

    यास्मिन वानखेडे आणि एका ड्रग्ज पेडलरसोबतचे काही चॅट नवाब मलिक यांनी व्हायरल केले आहेत. याबाबत यास्मिन वानखेडे म्हणाल्या, त्यांनी सोयीस्कर चॅट्सच ठेवले आहेत आणि आरोप करण्यास सुरूवात केली. माझ्याकडे अनेक व्यक्ती त्यांचं गाऱ्हाणं मांडतात. तसंच हे गाºहाणे होते.



    त्यातल्या तारखा नवाब मलिक यांनी डिलिट केल्या नसत्या आणि सोयीस्कर तेवढेच चॅट ठेवून मागचे-पुढचे संवाद उडवले नसते त्यांनी पूर्ण चॅट दाखवले असते. त्यांनी मला, अमृता फडणवीस यांना लक्ष्य करणं सोडून द्यावे.

    समीर वानखेडे यांच्या कपड्यांवरून, बुटांवरून प्रश्न विचारले जात आहेत. किती लज्जास्पद बाब आहे एक माणूस प्रामाणिकपणे त्याचं काम करतो आहे. तरीही त्या व्यक्तीला लक्ष्य केलं जातं आहे. समीर वानखेडे हे कर भरतात, तुम्ही चौकशी करू शकता. तसंच ते कोणते शर्ट वापरतात, कोणते बूट वापरतात हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे.

    तरीही त्यांच्याबाबत असे प्रश्न निर्माण करणं नवाब मलिक यांना शोभत नाही असंही यास्मिन वानखेडे यांनी म्हटलं आहे. एक प्रामाणिक अधिकारी चांगले कपडे का घालतो हे पण विचारलं जातं आहे, हा अधिकार नवाब मलिकांना कुणी दिला? असाही प्रश्न यास्मिन यांनी उपस्थित केला आहे.

    नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा खंडणी वसुलीचे आरोप केले होते. समीर वानखेडे कोट्यवधी रुपयांचे कपडे आणि बूट वापरतात हे सगळं कुठून येतं? असा सवालही मलिकांनी केला होता.

    Nabab Malik is retarded leader, Sameer Wankhedes sister accused

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!