प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध महाराष्ट्रभर संयुक्त सभांचा धडाका कारवण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या सभांचा आराखडा निश्चित करून त्यांची जबाबदारी वाटप केले. MVA so called seats sharing, Congress given 8 loksabha seats, nana patole rejects formula and even discussion
मात्र या संदर्भातल्या मराठी माध्यमांनी कथित सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातम्यांमध्ये महाविकास आघाडीने लोकसभेसाठी जागावाटप निश्चित केले असून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 21 जागांवर ठाकरे गट 19 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि 8 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले. मात्र ही संपूर्ण चर्चाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळून लावली आहे. महाविकास आघाडीत मुळात लोकसभेच्या जागा वाटपात चर्चा झाली नाही तिथे फक्त संयुक्त सभांची चर्चा झाली आणि त्याचे नियोजन केले असे उत्तर नानांनी आज पत्रकारांना दिले.
महाविकास आघाडीत लोकसभेचे जागावाटप झाल्याच्या बातम्या काही मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. त्यामध्ये अर्थातच काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर ढकलून 8 जागा म्हणजे सिंगल डिजिट जागा दिल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या गटाशी युती केलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वाट्याला देखील या जागा वाटपातून एकही जागा आली नसल्याचे नमूद केले होते. मात्र सूत्रांच्या हवाल्याने दिलेली ही संपूर्ण बातमीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी फेटाळून लावली.
काँग्रेसने आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात महाराष्ट्रात कधीच सिंगल डिजिट जागा लढलेल्या नाहीत. 48 पैकी 8 जागा काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या वाट्याला येणे हे राजकीय दृष्ट्या काँग्रेसला सहन देखील होणार नाही आणि काँग्रेसच्या ताकदीला ते अनुकूल देखील नाही. तरीपण माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल ठरतील अशा बातम्या पेरून काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर ढकलत फक्त 8 जागा जागा वाटपात आल्याचे म्हटले होते. मात्र मूळातच महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चाट झाली नसल्याचे स्पष्ट करून नाना पटोले यांनी मराठी माध्यमांच्या आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला पूर्णपणे फेटाळून लावला.
MVA so called seats sharing, Congress given 8 loksabha seats, nana patole rejects formula and even discussion
महत्वाच्या बातम्या
- उत्तर कोरियाने पुन्हा डागले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, लक्ष्यावर आदळण्यापूर्वी केले 1,000 किमी उड्डाण
- खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय दूतावास बंद केला, हिंदूंविरोधात पोस्टर लावले
- शक्तिशाली भूकंपामुळे हादरले न्यूझीलंड, रिश्टर स्केलवर 7.0 होती तीव्रता, त्सुनामीचा अलर्ट
- राष्ट्रवादीची छुपी चाल; उद्धवना हळूच बाजूला सार!!