विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीला भरतीच्या ऐवजी ओहोटी, त्यात आता वंचितने केली दमबाजी, त्यामुळे आघाडीला पुन्हा स्वीकारावी लागली नरमाई!!, अशी पवार + ठाकरे आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे.MVA on the back foot on seat sharing with prakash ambedkar
महाविकास आघाडीत सुरुवातीला जोर चढल्यासारखी भरती जरूर झाली बजरंग सोनवणेंसारखे कार्यकर्ते दाखल होऊन त्यांनी बीडची उमेदवारी पटकावली, पण महादेव जानकर यांचा फटका थेट शरद पवार यांना बसल्याने आघाडी सुरुवातीलाच बॅकफूटला गेली. माढा लोकसभा मतदारसंघातून खुद्द शरद पवारांनी महादेव जानकर यांची उमेदवारी जाहीर करून देखील महादेव जानकर हे शरद पवारांना सोडून महायुतीच्या गोटात दाखल झाले. फडणवीस यांनी थेट पवारांना धोबीपछाड दिला, असे बोलले गेले.
दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी मैदानात उतरले, तरी त्यांनी महाविकास आघाडीच्या छत्राखाली यायचे नाकारले. त्यामुळे महाविकास आघाडीला दुहेरी फटका बसला.
त्यातच आज प्रकाश आंबेडकरांनी एक व्हिडिओ जारी करत लाचारी मान्य करणार नाही. आंबेडकर चळवळ संपू देणार नाही, अशी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना दमबाजी केली. त्या पाठोपाठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेते झाले, पण प्रत्यक्षात तिथे चर्चेखेरीज निष्पन्न झाले नाही.
उद्या लोकसभा निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्यातल्या जागांवर फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करून झाले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तरी या दोन पक्षांना काळजी नाही, पण महाविकास आघाडीचे घोडेच पुढे सरकायला तयार नाही. त्यात महाविकास आघाडीला भरती ऐवजी ओहोटी लागल्याने नव्याने विचार करायची वेळ आली आणि प्रकाश आंबेडकरांनी दमबाजी केल्याने पुन्हा नरमाईची भूमिका स्वीकारत त्यांना 4 ऐवजी 5 जागांची ऑफर द्यावी लागली. आता प्रकाश आंबेडकर ही ऑफर स्वीकारतात की नाकारतात, यावर महाविकास आघाडीचे खरे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
MVA on the back foot on seat sharing with prakash ambedkar
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी मॉस्को दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध, रशियाला सहकार्याचे दिले आश्वासन
- केमिकल फॅक्टरीला भीषण आग, बॉयलरचा स्फोट होऊन ५ कामगारांचा मृत्यू
- काँग्रेसने 46 उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर, महाराष्ट्रातील केवळ चार जागांचा समावेश!
- बँक खाती गोठवल्या प्रकरणी ‘…तर ही परिस्थिती उद्भवली नसती’ म्हणत संबित पात्राचा काँग्रेसला टोला