प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीने काढलेल्या हल्लाबोल महामोर्चासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता, असा दावा नेत्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात या मोर्चात केवळ काही हजारांची गर्दी असल्याचा खुलासा पोलीसांनी केला आहे. The Mahavikas Aghadi claims that lakhs of people gathered in the Mahamorcha
पोलिसांच्या आकडेवारीनुसार या मोर्चात 60000 लोक सहभागी झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा लाखोंच्या गर्दीचा दावा फोल ठरला आहे. 2 आठवड्यांपासून महाविकास आघाडीचे नेते या मोर्चाची जय्यत तयारी करीत होते. महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर मोर्चासाठी माणसे आणायची जबाबदारी दिली होती. या मोर्चासाठी राज्यभरातून जवळपास 2 ते 2.5 लाखाच्या संख्येने जनसमुदाय येण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वर्तविली होती.
महामोर्चा फसला; माध्यमांनी ड्रोन शॉट का नाही दाखवले??; फडणवीसांचा खोचक सवाल
भायखळा जिजामाता उद्यान (राणीबाग) येथून मोर्चाची सुरुवात होणार होती, मात्र 2 दिवस अगोदर काही कारणास्तव हा मोर्चाचे ठिकाण बदलून नागपाडा येथील रिचर्ड अँड क्रुडास या कंपनीजवळ ठेवले.
शनिवारी सकाळी 10.00 वाजता रिचर्ड अँड क्रुडास या कंपनीजवळ मोर्चेकरी आणि नेते जमायला सुरुवात झाली. 12.00 सुमारास हा मोर्चा सर जे.जे. उड्डाण पुलावरून सीएसएमटी टाइम्स ऑफ इंडिया इमारती दुपारी 1.30 आसपास येऊन ठेपला, त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन 2.30 वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा संपला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या मोर्चात 60000 हजारांच्या आसपास उपस्थिती होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने मोर्चाची ही आकडेवारी काढली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 2.5 ते 3 लाख लोक मोर्चात सहभागी होते, असा दावा केला होता. परंतु पोलिसांच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा फोल ठरला आहे.
MVA leaders talk claims of lakhs of people in morcha, but police tell it was in thousands of public participation
महत्वाच्या बातम्या
- महामोर्चा आघाडीचा; अजेंडा राष्ट्रवादीचा; जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची जबाबदारी शिवसेनेची; काँग्रेस, समाजवादी पक्ष “मम” म्हणायला!!
- महामोर्चाच्या परवानगी वरून महाविकास आघाडीचा बवाल, पण मोर्चाला पोलिसांची परवानगी
- भारत जोडो यात्रेचे 100 दिवस पूर्ण; सावरकर टीआरपीच्या सावटाखाली धुगधुगती लिबरल आशा
- JEE Main 2023 परीक्षा जानेवारीत; करा अर्ज; ‘या’ आहेत महत्त्वाच्या तारखा