• Download App
    तोंडी आघाडीची भाषा पक्ष मजबुतीसाठी ठाकरे गट - राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका!! MVA leaders only talked of unity, but preparations on for self Consolidation

    तोंडी आघाडीची भाषा पक्ष मजबुतीसाठी ठाकरे गट – राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका!!

    प्रतिनिधी

    मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सिल्वर ओक या निवासस्थानी आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या. त्याचे वेगवेगळे फॉर्मुले मराठी माध्यमांनी चर्चा केली पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नसल्याचे खुलासे नंतर झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस संदर्भात नेमका हाच खुलासा केला. MVA leaders only talked of unity, but preparations on for self Consolidation

    या पार्श्वभूमीवर तिने घटक पक्षांच्या नेत्यांच्या तोंडी आघाडीची भाषा आणि प्रत्यक्षात स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी स्वतंत्र बैठका असे आज मुंबईत घडले आहे.

    उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शहर प्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केले, तर राष्ट्रवादीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बोलवून शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.

    ठाकरे गट आणि राष्ट्रवादी या दोन्ही स्वतंत्र बैठकांमध्ये निवडणुकीची प्रामुख्याने चर्चा झाली त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघांमध्ये कोणाला उभे करायचे वगैरे चर्चा झाली. त्या संदर्भातल्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी दिल्या. यामध्ये ठाकरे गट स्वतःच्या 23 जागांवर ठाम, तसेच राष्ट्रवादी 11 जागांची चाचणी करत असल्याच्या बातम्या आल्या.

    पण ठाकरे गटाच्या बैठकीत निवडणुकीत चर्चा झाली नसल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. शिवसेनेचे राज्यभरातले मेळावे, 19 जून रोजी शिवसेनेचा स्थापनादिन संपूर्ण महाराष्ट्रभर कसा साजरा करायचा याचे मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच सुप्रीम कोर्टाचा निर्णय प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा संदेश त्यांनी दिला, असे दानवे यांनी सांगितले.

    तर राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडे, एकनाथ खडसे वगैरे नेत्यांवर विशिष्ट विभागांच्या जबाबदाऱ्या सोपवल्याची बातमी माध्यमांनी दिली. त्याचवेळी शरद पवारांनी महाविकास आघाडी टिकवा, असा संदेश दिल्याचेही सांगितले गेले. अर्थात पवारांनी या बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा घेताना राष्ट्रवादी दोन नंबरला असलेल्या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणूक लढवता येईल? पक्ष संघटनेची बांधणी कशी मजबूत करता येईल?, यावर भर दिला.

    याचा अर्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडी आघाडीचेच भाषा आहे. पण त्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडीतली बार्गेनिंग पॉवर वाढविण्यासाठी स्वतःच्या पक्ष मजबुतीसाठी या नेत्यांनी स्वतंत्र बैठका घेऊन आपल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना विशिष्ट “राजकीय संदेश”ही दिला आहे.

    MVA leaders only talked of unity, but preparations on for self Consolidation

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात

    Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- राज्यात कुठेही हिंदी लादली जात नाही; भारतीय भाषेला विरोध करून इंग्रजीचे गोडवे गाण्याचे वाईट वाटते