• Download App
    भाजपाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा|MVA leaders may come together in United rallies, but will that unity remain intact in seat adjustment??

    भाजपाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्तापालट घडवून आणणाऱ्या भाजपने आता शिंदेंच्या शिवसेनेसोबत पुढचे राजकारण सुरू केले असताना शिंदेच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने उद्धव ठाकरे यांचा गट कमकुवत झाला आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कसब्याच्या पोट निवडणुकीत भाजपचा महाविकास आघाडीने पराभव केल्यामुळे महाविकास आघाडीच्या पक्षांना जोर आला आहे. त्यामुळे आता राज्यभर महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत. तसा निर्णय बुधवारी, ८ मार्च रोजी विधानभवनात उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.MVA leaders may come together in United rallies, but will that unity remain intact in seat adjustment??



    राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी देखील कामाला लागली आहे. महाविकास आघाडी आता सरकार विरोधात आक्रमक भूमिकेत आहे. एप्रिल ते मे महिन्यात महाविकास आघाडी राज्यभरात संयुक्त सभा घेणार आहे.

    या सभांमध्ये स्वत: उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले हे नेते मार्गदर्शन करणार आहेत. या संयुक्त सभेपूर्वी महाविकास आघाडीचा १५ मार्चला मेळावा होणार आहे. विधिमंडळात अजित पवार यांच्या दालनात उद्धव ठाकरे, जयंत पाटील, अंबादास दानवे आणि इतर नेत्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला.

    MVA leaders may come together in United rallies, but will that unity remain intact in seat adjustment??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस