• Download App
    MVA पवारांच्या डावातून आलेल्या 85 च्या फॉर्म्युलावर असमाधान; काँग्रेस आणि शिवसेना सेंच्युरी मारण्यावर ठाम!!

    MVA : पवारांच्या डावातून आलेल्या 85 च्या फॉर्म्युलावर असमाधान; काँग्रेस आणि शिवसेना सेंच्युरी मारण्यावर ठाम!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बराच वाद घालून अखेरीस 85 चा फॉर्म्युला काढला. काँग्रेस + शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी 85 जागा लढविण्याचा निर्णय जाहीर केला, पण तो जाहीर करताना आकड्यांची बेरीज चुकवली. तीन पक्षांचा 85 फॉर्म्युल्यातून 255 बेरीज झाली. पण नानांनी ती 270 सांगितली. त्यामुळे आघाडीची अब्रू गेली. म्हणून मग सगळ्यांनी त्यांना सारवासारव करावी लागली.

    पण त्या पलीकडे जाऊन 85 चा फॉर्म्युल्यातून काँग्रेस आणि शिवसेना समाधान होण्यापेक्षा त्यांच्या असमाधानाच पसरले. कारण विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस 100 ते 105 जागा लढवेल, असे जाहीर करून टाकले. त्या आकड्याला त्यांनी मेरिट जोडले. काँग्रेसला 100 ते 105 जागा लढवायला मिळतील. कारण जिंकून येण्याचे मेरिट लावले, तर तो आकडा जुळतो असे वडेट्टीवार म्हणाले. त्यावर आज संजय राऊत यांनी वडेट्टीवार हे फार विद्वान नेते आहेत. त्यांनी काही काळ शिवसेनेत काम केले आज ते काँग्रेसचे मोठे नेते आहेत विधानसभेतले विरोधी पक्षनेते आहेत. ते जर मेरिट वर बोलत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असा टोला हाणला. त्याच वेळी शिवसेना देखील सेंच्युरी मारेल, असे राऊतांनी सांगून महाविकास आघाडीतले असमाधानच प्रगट केले.


    Maharashtra Board महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय!, आता विद्यार्थ्यांना नापास होण्याची चिंता नाही


    85 हा फॉर्म्युला शरद पवारांच्या डोक्यातून आला. तो त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या गळी उतरवला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा झाल्यावर काँग्रेसच्या नेत्यांचे कान टवकारले गेले. कारण पवार स्वतः डबल डिजिटमध्येच कायम खेळत असताना ते काँग्रेसला “समान” फॉर्म्युल्याच्या नावाखाली डबल डिजिट वर आणत असल्याचा “डाव” या निमित्ताने उघड झाला. म्हणून काँग्रेस नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या तोंडून ट्रिपल डिजिटच वदवून घेतले.

    त्यावर आज पवारांचे समर्थक संजय राऊत यांनी वडेट्टीवार यांना “विद्वान नेते” असा टोमणा हाणून त्यांच्या ट्रिपल डिजिट वक्तव्याचा राजकीय बदला घेतला. त्यातून पुन्हा काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सेंच्युरीचा वाद सुरू झाला.

    MVA leaders 85 formula failed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bachchu Kadu : बच्चू कडूंचा इशारा- शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली केल्यास ठोकून काढू, बँक मॅनेजरला फोनवरून धमकी

    Vijay Vadettiwar हनी ट्रॅप प्रकरणात विजय वडेट्टीवार यांचा आरोप : ५० मंत्री-अधिकाऱ्यांचा समावेश, लोढाकडून २०० कोटींची वसूली

    फडणवीस सरकार वरल्या आरोपांच्या गदारोळात महामंडळांचे सत्ता वाटप बिनबोभाट!!