विशेष प्रतिनिधी
मुंबई : जागांचा आग्रह खेचाखेची नुसत्याच बातम्या महाविकास आघाडीच्या ना बैठका, ना वरिष्ठांच्या चर्चा, मराठी माध्यमे टाळत आहेत पडद्याआडच्या बातम्या!!, अशी अवस्था महाविकास आघाडीची राजकीय अवस्था झाली आहे.
महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी जागावाटपाट विशिष्ट जागा झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या आहेत. यात मुंबईमध्ये शिवसेना 22 जागांवर काँग्रेस 18 जागांवर तर शरद पवारांची राष्ट्रवादी 7 जागांवर ठाम असल्याचा असल्याचे दावे मराठी माध्यमांनी बातम्यांमधून केले आहेत. प्रत्यक्षात या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी कुठलीच माहिती उघडपणे कोणाला दिल्याचे दिसलेले नाही. गेल्या कित्येक दिवसांमध्ये तर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते एकमेकांना भेटल्याच्याही बातमी आलेल्या नाहीत. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे आपापल्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहेत. त्यांनी विधानसभा जागा वाटप संदर्भात ना कुठे बैठक घेतली, ना कुणाशी चर्चा केली, तरी देखील पडद्याआडच्या हालचालींमध्ये जागा वाटपाच्या खेचाखेची सुरू असल्याच्या बातम्यांची भरमार मराठी माध्यमांनी चालवली आहे.
या बातम्यांमध्ये विसंगती देखील मोठी आहे. एकीकडे ठाकरे आणि काँग्रेस मुंबई जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बातम्यांमध्ये म्हटले आहे, तर दुसरीकडे त्याच बातम्यांमध्ये मुंबईतल्या भाजपच्या बालेकिल्ल्याच्या 5 जागा आपल्याकडे येऊ नयेत, यासाठी हे दोन्ही घटक प्रयत्न करत असल्याचेही बातम्यांमध्ये नमूद केले आहे. मलबार हिल, चारकोप, गोरेगाव या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष भाजप विरोधात उतरायला घाबरत असल्याचा दावा बातम्यांमध्ये माध्यमांनी केला, पण त्याला कोणीही दुजोरा दिला नाही.
या सगळ्यात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहणार की नाही??, त्यांना शरद पवार महाविकास आघाडी ठेवणार की नाही??, की प्रत्यक्षात महाविकास आघाडी जशी आहे, तशी अस्तित्वात राहून पवार पडद्यामागून वेगळ्याच आघाडीच्या तयारीत व्यग्र राहणार??, हे सगळे कळीचे प्रश्न आहेत. किंबहुना हेच मुद्दे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. त्यावर मात्र “पवार बुद्धीची” मराठी माध्यमे बोलायला तयार नाहीत. कारण तशा बातम्या देणे पवारांसाठी गैरसोयीचे ठरू शकते अशा अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या आहेत.
Marathi media avoids giving news of cracks in MVA
महत्वाच्या बातम्या
- “हिंदुत्व” सोडले म्हणून ठाकरेंना शिंदेंनी ठोकले; पण शिंदे सेनेचे “हिंदुत्व” बुरखे वाटपावर आले!!
- Lucknow : यूपीत धर्मांतर करणाऱ्या 12 दोषींना जन्मठेप; 4 जणांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा; 1000 लोकांचे धर्मांतर
- Devendra Fadnavis : काँग्रेसी पंतप्रधानांच्या इफ्तार पाट्या जोरात; पण मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनाला गेले, तर मोठा गहजब!!
- Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाच्या जामीन याचिकेवर कर्नाटक हायकोर्टात सुनावणी; कोर्टाने म्हटले- सुनावणी खुल्या न्यायालयात होऊ शकत नाही