विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी टाइम्स नाऊ आणि मॅट्रिक्सने घेतलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात महाविकास आघाडी सत्तेपासून कोसो दूर असल्याचे निष्कर्ष समोर आले. परंतु, निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर केली नसल्याचे खापर मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर फोडले. MVA far distant from power in maharashtra
टाइम्स नाऊ आणि मॅट्रिक्सने घेतलेल्या विधानसभा निवडणुकी पूर्वीच्या पहिल्या सर्वेक्षणात महाविकास आघाडी सत्तेपासून दूर असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर केलेली मात या सगळ्या फॅक्टर्सचा महाविकास आघाडीच्या यशावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसले नाही.
उलट आजही भाजपच 95 ते 105 जागा मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनेल, असाच निष्कर्ष सर्वेक्षणातून दिसून आला. त्या खालोखाल काँग्रेस 42 ते 47 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनेल. एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी यांना मोठा फटका बसून ते अनुक्रमे 19 ते 24 आणि 7 ते 12 या जागांच्या आसपास राहतील. तसाच परिणाम उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांनाही बघायला मिळेल. ठाकरेंच्या शिवसेनेला 26 ते 31 जागा, तर पवारांच्या राष्ट्रवादीला 23 ते 28 जागा, तसेच इतरांना 11 ते 16 जागा मिळतील, असा टाइम्स नाऊ आणि मॅट्रिक्सच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष समोर आला.
राऊत – कोल्हेंची टीका
मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फक्त लोकसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स डोक्यात ठेवून शिंदे – फडणवीस सरकारवर टीका चालविली. निवडणूक आयोगाने कालच जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांची विधानसभा निवडणूक जाहीर केली. परंतु महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर केली नाही, याचे खापर खासदार संजय राऊत आणि अमोल कोल्हे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर फोडले. सरकार निवडणुकीला घाबरले म्हणूनच त्या जाहीर केल्या नाहीत, असा दावा या दोन्ही नेत्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 नेशन 1 इलेक्शनच्या बाता मारतात पण 4 राज्यांच्या निवडणूका ते एकत्र घेऊ शकत नाहीत, असे शरसंधान संजय राऊत यांनी साधले.
MVA far distant from power in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!