• Download App
    Jarange movement जरांगेंच्या आंदोलनाला नाशकातून मुस्लिमांचा पाठिंबा; पाठविल्या 2500 भाकऱ्या!!

    जरांगेंच्या आंदोलनाला नाशकातून मुस्लिमांचा पाठिंबा; पाठविल्या 2500 भाकऱ्या!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले. मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावरील उपोषण आणखी एका दिवसासाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. नाशिकमधल्या मुस्लिमांनी जरांगेंना पाठिंबा दिला. मुस्लिम महिलांनी 2500 भाकऱ्या मुंबईला पाठविल्या. Jarange movement

    मनोज जरांगे यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांना नाशिक जिल्ह्यातील येवला-लासलगाव मतदारसंघातून भाकरी पुरविल्या जात आहे. या व्यवस्थेत मुस्लीम समाजाचाही मोठा पुढाकार दिसून येत आहे. मुस्लीम समाजाच्या महिलांनी मराठा आंदोलनकर्त्यांसाठी तब्बल 2500 भाकऱ्या तयार करून पाठविल्या.

    भाकरी, चपाती मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना

    तर ‘एक भाकर समाजासाठी’ हे ब्रीद घेऊन नाशिकच्या येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधव भाकरी, चपाती, चटणी, ठेचा व जेवणाचे साहित्य घेऊन मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले. एक भाकर समाजासाठी यात ओबीसी, मुस्लीम समाजाकडूनही भाकरी, चपाती देण्यात आल्या आहे. यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लासलगाव जवळील विंचूर येथे नाशिक छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.



    मराठ्यांनी सीएसएमटीच्या मधोमध शेगडी पेटवून बनवले पोहे

    दरम्यान, कालपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल झाले. या मराठा आंदोलकांना पिण्याचे पाणी, शौचालयात पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर उतरले. मराठा आंदोलकांनी या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. प्रशासनाने दुसऱ्या दिवशीही सीएसएमटी परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवली. त्यामुळे मराठा आंदोलकांचे काल खाण्यापिण्याचे हाल झाले होते. अनेक मराठा आंदोलक काल रात्रभर उपाशी राहिले होते. रात्रभर सीएसएमटी स्थानकात मुक्काम करावा लागल्याने मराठा आंदोलक चांगलेच वैतागले होते. सकाळी आजुबाजूला खाण्याचा काही पर्याय नसल्याने संतापलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्त्याच्या मधोमध शेगडी पेटवून पोहे बनवायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते.

    Muslims from Nashik support Jarange movement; 2500 loaves of bread sent!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मराठा आरक्षणाचा विषय शरद पवारांनी घातला केंद्र सरकारच्या गळ्यात; अजितदादा म्हणाले, मला जायला लावू नका खोलात!!

    Manoj Jarange : हैद्राबाद गॅझेट लागू करण्यास न्या. शिंदे समितीची तत्वतः मान्यता

    Pune Municipal Corporation : पुरस्कार तर मिळाला पण पुणे महापालिकेच्या SAP प्रणालीचा अत्यल्प वापर; ८ कोटींचा खर्च वाया?