विशेष प्रतिनिधी
मुंबई : आरक्षण ओबीसी मधून की EWS आर्थिक मागास प्रवर्गातून, या वादात अडकून मराठा तरुण महाराष्ट्रातल्या पोलिस भरतीतून बाजूला सरले. त्यामुळे आर्थिक मागास प्रवर्गाचे आरक्षण मिळवून पोलिस भरतीत मुस्लिम घुसले. पोलिस भरतीच्या यादीतून ही धक्कादायक बाब पुढे आली. त्यामुळे आरक्षणाचा वाद घालत बसलेल्या मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यावर सोशल मीडियातून संताप व्यक्त झाला. Muslim police recruitment through EWS in maharashtra
पोलिस मदतीची एक यादी सोशल मीडियात फिरली. त्यामध्ये EWS आरक्षणातून भरती झालेली नावे शेख, सैय्यद, पठाण अशी आढळली. नांदेड, बीड नंतर पुण्यात पोलिस भरती झाली. त्यामध्ये अशीच नावे आढळली. त्यामुळे जेवणाने भरलेला ताट धुडकावून शरद पवारांच्या नादी लागून मराठा समाज सर्वात मोठे नुकसान झाल्याचे शरसंधान अनेकांनी साधले.
मराठा समाजातील मुलांना आरक्षणाच्या वादात आणि आंदोलनात “बिझी” ठेवून, मुस्लिमांना पोलीस भरती मध्ये घुसवून नक्की कुणाचं भल करण्याच्या डाव होता??, 1 वर्षे आधी, EWS मध्ये मराठा समाजातील 95 % मुलं भरती होत होती, आता 95 % मुस्लिम मुलं भरती होत आहेत, हे धक्कादायक वास्तव अनेकांनी समोर आणले.
अग्निपथ योजनेला एकीकडे काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बाकीच्या विरोधी पक्षांनी हाणून पाडण्याचा डाव आखला, दुसरीकडे मशिदींमधून मुस्लिम युवकांना अग्निपथ योजनेतून अग्निवीर बनावे म्हणून फतवे काढले गेले. तसाच महाराष्ट्रातल्या पोलिस भरतीत प्रकार घडला.
Muslim police recruitment through EWS in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- बीजेडी नेत्या ममता मोहंता यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Ashwini Vaishnav :’आम्ही रील बनवणारे नाही, काम करणारी माणसं आहोत’ ; रेल्वेमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं!
- खाशाबा जाधवांनंतर स्वप्नीलने महाराष्ट्राला मिळवून दिले ऑलिंपिक पदक; शिंदे – फडणवीस सरकारचे 1 कोटींचे बक्षीस जाहीर!!
- Union Minister Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची विम्याच्या हप्त्यावरून जीएसटी हटवण्याची मागणी; अर्थमंत्री सीतारामन यांना लिहिले पत्र