Muslim organisations : उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने मौलाना कलीम सिद्दिकी, मौलाना उमर गौतम आणि मुफ्ती जहांगीर यांना अटक केल्यानंतर आता निदर्शने सुरू झाली आहेत. पुण्यातील अनेक मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘कुल जमात तंझीम’ या गटाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निषेध केला. Muslim organisations hold protest in pune against arrest of Maulavi in UP In Religion Conversion Case
प्रतिनिधी
पुणे : उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने मौलाना कलीम सिद्दिकी, मौलाना उमर गौतम आणि मुफ्ती जहांगीर यांना अटक केल्यानंतर आता निदर्शने सुरू झाली आहेत. पुण्यातील अनेक मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘कुल जमात तंझीम’ या गटाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निषेध केला.
या आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, जमात-ए-इस्लामी-ए-हिंद, द मुस्लिम फाउंडेशन, जमीयत उलेमा-ए-हिंद आणि सीरेट कमिटी यांचा समावेश होता. या सर्व संघटनांनी आरोप केला की, मुस्लिम मौलवींवर लावण्यात आलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत आणि ते तत्काळ मागे घ्यावेत. संघटनांनी म्हटले आहे की, ही अटक लोकशाहीविरोधी आणि असंवैधानिक आहे.
‘देशाला कमकुवत करण्याचे षडयंत्र’
संघटनांनी म्हटले की, मुस्लिम नेते आणि विशेषतः मौलवींना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेचे वर्तन अतिशय धोकादायक आहे. ते म्हणाले की, देशाला कमकुवत करण्याचे हे षडयंत्र आहे. मौलाना कलीम सिद्दीकीच्या अटकेचे कारण उद्देश उत्तर प्रदेश सरकारचे उजव्या विचारसरणीचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. इस्लामचे विद्वान आणि मौलवींना लक्ष्य करण्याशिवाय यात दुसरे काही नाही.
तन्झीमचे संयोजक जाहिद शेख म्हणाले की, अवैध पैसे आणि धर्मांतराच्या आरोपांमध्ये सत्याचा कोणताही पुरावा नाही. दुसरीकडे तन्झीमचे अझहर तांबोळी म्हणाले की, अटक केलेल्यांवरील आरोप हटवून त्यांना ताबडतोब सोडण्यात यावे, अशी मागणी करत सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर केले आहे.
Muslim organisations hold protest in pune against arrest of Maulavi in UP In Religion Conversion Case
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल, दरवाढीविरोधात विनापरवानगी केले होते आंदोलन
- WATCH : ना बडेजाव, ना मोठेपणाचा आव, केंद्रीय कायदा मंत्र्यांनी ग्रामस्थांसोबत लोकगीतांवर धरला ठेका, पीएम मोदींनीही केले कौतुक
- काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांनी केले अमित शहा आणि संघाचे कौतुक, म्हणाले- कट्टर विरोधक असूनही संघाने आणि शहांनी मदत केली!
- फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सार्कोझी निवडणुकीत ‘अवैध पैसा’ वापरल्याप्रकरणी दोषी, न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा
- Bhawanipur Bypoll : भाजप नेत्याच्या कारवर हल्ला, तृणमूलवर तोडफोडीचे आरोप, बनावट मतदारांवरून गोंधळ, EC ने मागवला अहवाल