दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयात घुसून झाडल्या गोळ्या!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजप किसान मोर्चाचे नेते सुरेंद्र मतियाला यांची दिल्लीतील द्वारका जिल्ह्यातील मतियाला भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र मतियाला यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. सुरेंद्र मतियाला त्यांच्या कार्यालयात बसले होते, त्यानंतर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. Murder of BJP Kisan Morcha leader Surender Matiala in Delhis Dwarka
ही घटना बिंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुरेंद्र मतियाला हे नजफगड जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष होते आणि ते माजी नगरसेवकही होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी द्वारका जिल्ह्याचे डीसीपी एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, घटनास्थळी केलेल्या तपासात सुरेंद्र मतियाला यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्याचे आढळून आले. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.
पोलिसांची अनेक पथके तपासात गुंतली –
द्वारका जिल्ह्याचे डीसीपी पुढे म्हणाले की, सुरेंद्र मतियाला कार्यालयात असताना गोळ्या झाडल्या गेल्या. तपासात आणखी जी काही माहिती समोर येईल, ती लगेच अपडेट केली जाईल. पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. सुरेंद्र मतियाला यांची हत्या का करण्यात आली, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. हत्येनंतर परिसरात घबराट पसरली. त्याचबरोबर सुरेंद्र मतियाला यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळ सील केले आहे.
Murder of BJP Kisan Morcha leader Surender Matiala in Delhis Dwarka
महत्वाच्या बातम्या
- Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांचे निळ्या रंगाशी नेमके नाते काय?
- राज्यघटनेच्या शिल्पकाराला, कोट्यवधीसाठी महामानव असलेल्या डॉ. आंबेडकरांना ४ दशके उशीरा
- राहुल गांधी – पवारांसह सर्व विरोधकांच्या तोंडी एकीची भाषा, पण मग बेकी होतीये तरी का??
- विधवांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्द वापरण्यावरून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर आमनेसामने…