• Download App
    पुणे सॅनिटाईज करण्याची महापालिकेची मोहीम , पावसामुळे रोगट वातावरण ; कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पाऊल Municipal Corporation's campaign to sanitize Pune%

    पुणे सॅनिटाईज करण्याची महापालिकेची मोहीम , पावसामुळे रोगट वातावरण ; कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पाऊल

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे आणि शहर परिसर सॅनिटाईज करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्या अंतर्गत वाहनावर बसविलेल्या फवारणी यंत्राचा वापर केला जात आहे. Municipal Corporation’s campaign to sanitize Pune

    अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे शहर आणि परिसरात मोठा पाऊस पडला आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे हवामान रोगट बनले आहे. तसेच कोरोनाचा विषाणू अधिक फैलावू नये, याची काळजी घेतली जात आहे.



    कोरोनासह किंवा अन्य साथीचे आजार पसरू नयेत, याची काळजी घेण्याची अशा वातावरणात गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी फवारणी यंत्रणेने परिसर सॅनिटाइज केला जात आहे.

    दरम्यान, पुणे शहरात सोमवारी 684 रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या 4 लाख 59 हजार 987 झाली. सोमवारी दिवसभरात 2 हजार 790 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 33 हजार 798 झाली आहे. 18 हजार 440 रुग्णांपैकी 1402 रुग्ण गंभीर तर 5,287 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. 43 जण कोरोनाने सोमवारी दगावले होते.

    Municipal Corporation’s campaign to sanitize Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती