विशेष प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकमताने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “अजित सृष्टी” उभारण्याचा प्रस्ताव मान्य झाला. याबाबत नवनिर्वाचित महापौर श्री. रवि लांडगे आणि सर्व पदाधिकारी-नगरसेवक यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि सर्वानुमते प्रस्तावाला मान्यता दिली.
ही अजित सृष्टी उभारण्यासाठी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला असून अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर त्यांनी स्वतःहून ही अजित सृष्टी उभारण्याची घोषणा केली होती.
– राजकीय संघर्ष
महेश लांडगे यांची राजकीय कारकीर्द अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच सुरू झाली होती. पण 2014 नंतर महाराष्ट्रातली सगळी समीकरणे बदलण्याच्या पार्श्वभूमीवर महेश लांडगे यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून आणि नंतर भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीत यश मिळविले होते. 2025 च्या डिसेंबर मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत महेश लांडगे विरुद्ध अजित पवार हा संघर्ष राज्यभर तुफान गाजला होता.
अजित पवारांनी महेश लांडगे यांच्याविरुद्ध वैयक्तिक पातळीवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. महेश लांडगे यांनी सुद्धा कुठलीही कसर न सोडता अजित पवारांवर तितक्याच जोराने राजकीय प्रतिहल्ला केला होता. यामध्ये त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ मिळाली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत महेश लांडगे यांनी अजित पवारांवर मात करून दाखविली होती.
– मतभेद बाजूला
पण अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सगळेच राजकीय चित्र बदलले. महेश लांडगे यांनी राजकीय मतभेद आणि वैर तेवढ्यापुरतेच ठेवले. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अजित सृष्टी उभारण्याची घोषणा केली. आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजितसृष्टी उभारण्याला मंजुरी देण्यात आली.
Municipal Corporation approves construction of “Ajit Srishti” in Pimpri-Chinchwad
महत्वाच्या बातम्या
- AI फॉर एग्रीकल्चर वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा AI इंडिया समिटमध्ये विशेष संवाद!!; महाराष्ट्राचे मॉडेल स्वीकारले संपूर्ण देशाने!!
- DGCA : विमानात गोंधळ घातल्यास 30 दिवसांची बंदी लागेल; DGCAची सूचना
- राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!; फडणवीसांनी मारली पाचर
- महाराष्ट्रातल्या राजकीय धबडग्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र दिल्लीतल्या AI समिटमध्ये मुशाफिरी; महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण करार आणि घोषणा