• Download App
    कोरोनामुळे शूटिंग बंद, मग सुरू झाले सेक्स रॅकेट; पोलिसांनी अटक केल्यावर टॉप मॉडेलने सांगितले हादरवून टाकणारे वास्तव । Mumbai Sex racket Busted with top models and actress by Crime Branch in Juhu five star hotels

    धक्कादायक : कोरोनामुळे शूटिंग बंद, मग सुरू झाले सेक्स रॅकेट; पोलिसांनी अटक केल्यावर टॉप मॉडेलने सांगितले हादरवून टाकणारे वास्तव

    Mumbai Sex racket Busted with top models :  मुंबईत एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात टॉप मॉडेल आणि अभिनेत्री अडकली आहे. त्यापैकी एक टॉप मॉडेल असून तिने अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे आणि दुसरी एक अभिनेत्री आहे जिने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ही मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत होती. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून पकडले आहे. Mumbai Sex racket Busted with top models and actress by Crime Branch in Juhu five star hotels


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईत एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात टॉप मॉडेल आणि अभिनेत्री अडकली आहे. त्यापैकी एक टॉप मॉडेल असून तिने अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे आणि दुसरी एक अभिनेत्री आहे जिने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ही मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत होती. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून पकडले आहे. या मॉडेल आणि अभिनेत्रींना मुंबई पोलिसांनी अटक केली नाही, पण त्यांना सेक्स रॅकेटच्या तावडीतून सोडवणार असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री आणि मॉडेलऐवजी रॅकेट चालवणाऱ्या महिला दलालला अटक करण्यात आली आहे.

    अटक केल्यानंतर चौकशीत ईशा खानने सांगितले की, ती गेली अनेक वर्षे हे सेक्स रॅकेट चालवत आहे. ती दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत असे. यामध्ये ती तिचे 50 हजार रुपये कमिशन ठेवायची आणि उरलेले दीड लाख रुपये संबंधित मॉडेल आणि अभिनेत्रीला द्यायची.

    चौकशीत मॉडेलने सांगितले सेक्स रॅकेटमध्ये जाण्याचे कारण

    चौकशीदरम्यान, मॉडेल आणि अभिनेत्रीने सांगितले की, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे शूटिंग थांबले होते, हाताला काम नव्हते. म्हणूनच ती सेक्स रॅकेटमध्ये सामील झाली. ईशा खान ग्राहकांशी संपर्क साधायची. ती मॉडेल, अभिनेत्री आणि कॉल गर्ल्सची प्रोफाइल आणि छायाचित्रे ग्राहकांसोबत शेअर करायची. ग्राहकांना जी आवडेल त्यांच्यासोबत रेट, तारीख आणि वेळ ठरवायची. मग जुहूसारख्या पॉश भागात असलेल्या हॉटेल्समध्ये खोल्या बुक केल्या जात. मॉडेलला त्या खोलीत पाठवण्यात यायचे. दोन तासांसाठी दोन लाख रुपये आकारण्यात येत होते.

    दोन तासांचे दोन लाख रुपये

    मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून ईशा खानशी संपर्क केला. ईशा खानला सांगितले की, त्यांना आणि त्यांच्या एका मित्राला टॉप मॉडेल हव्या आहेत. यानंतर ईशा खानने व्हॉट्सअॅपवर अनेक फोटो पाठवले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन मुलींचे फोटो निवडले. त्यापैकी एकीने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे आणि दुसरीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

    गुन्हे शाखेने असा रचला सापळा

    ईशा खानने प्रत्येक मुलीसाठी दोन तासांसाठी दोन लाख रुपयांचा रेट ठरवला. बनावट ग्राहक बनून आलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी होकार कळवला. जुहूमध्ये हॉटेलदेखील बुक केले होते. गुरुवारी रात्री महिला दलाल आणि मॉडेल व अभिनेत्री हॉटेलच्या बाहेर पोहोचताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना आपल्या ताब्यात घेतले.

    Mumbai Sex racket Busted with top models and actress by Crime Branch in Juhu five star hotels

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mukesh Ambani : मुकेश अंबानी म्हणाले- AI मानवी इतिहासातील सर्वात मोठे तंत्रज्ञान; प्रत्येक भारतीयाला स्वस्त AI देण्याचा संकल्प

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली